26.6 C
New York

Amol Mitkari : मनेसविरोधात मिटकरींनी थोपटले दंड, मुलीसह पोलीस स्टेशनसमोर ठिय्या आंदोलन

Published:

अकोला

राज्यात सध्या राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) आणि मनसे (MNS) पदाधिकाऱ्यांमध्ये चांगलाच वाद झाल्याचे पाहायला मिळाले. अकोल्यातील राडा प्रकरणात आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) अकोला पोलिसांवर प्रचंड नाराज आहेत. गुन्हा दाखल झालेल्या 13 पैकी 3 आरोपींना जामीन मंजूर झाले आहेत. चार आरोपींना आज ताब्यात घेतलं. अमोल मिटकरी जिल्हा पोलीस अधिक्षक (Superintendent of Police) बच्चनसिंग (Bachchan Singh) यांच्या भेटीसाठी जिल्हा पोलीस अधिक्षक कार्यालयात दाखल झालेत.

अकोला पोलीस अधिक्षक कार्यालयात आमदार अमोल मिटकरींचं मुलीसह ठिय्या आंदोलन सुरु आहे.अकोल्यातील राडा प्रकरणात आमदार अमोल मिटकरी अकोला पोलिसांवर प्रचंड नाराज आहेत. गुन्हा दाखल झालेल्या 13 पैकी 3 आरोपींना जामीन मंजुर झाला आहे. चार आरोपींना पोलीसांकडून ताब्यात घेण्यात आलं आहे. अमोल मिटकरी जिल्हा पोलीस अधिक्षक बच्चनसिंग यांच्या भेटीसाठी जिल्हा पोलीस अधिक्षक कार्यालयात दाखल आहेत. मिटकरींनी मनसे कार्यकर्त्यांवर जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केला होता. आरोपींना पळून जाण्यासाठी काही पोलीस अधिकार्यांनी मदत केल्याचा गंभीर आरोप मिटकरींनी यावेळी केला आहे. राज ठाकरे यांच्यावर अमोल मिटकरी यांनी सुपारीबाज असा उल्लेख करत विधान केलं होतं. त्यावरुनच मनसे कार्यकर्त्यांनी अमोल मिटकरी यांच्या चार चाकी गाडीची तोड फोड केली होती.

अमोल मिटकरी यांनी कर्णबाळा दुनबळे याच्यावर हल्लाबोल करताना त्याच्या अटकेचीही मागणी केलीय. कर्णबाळा हा पोलिसांचा जावई आहे का, त्याला आधी अटक करा अशी मागणी मिटकरी यांनी केली आहे. तर जामीन मिळालेल्या मनसे कार्यकर्त्यांना हा न्यायालयाचा भाग आहे. असेही मिटकरी म्हणाले, पण कर्णबाळा याला अमोल मिटकरी कोण आहे दाखवून देईल असा इशारा त्यांनी दिला आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img