7.8 C
New York

Radhakrushna Vikhe Patil : मंत्री विखेंचे दूध भेसळखोरी करणाऱ्यांवर कारवाईचे निर्देश

Published:

भेसळयुक्त दूध आढळून आल्यास संबंधितांवर कडक कारवाई करण्याचे निर्देश महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrushna Vikhe Patil) यांनी दिले आहेत. अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात आज दुधभुकटी अनुदान योजना आणि जिल्हास्तरीय दुध भेसळ समितीच्या आढावा बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी विखे पाटील बोलत होते.पुढे बोलताना विखे पाटील म्हणाले, जिल्ह्यातील प्रत्येक दुध संकलन केंद्रावर उच्चप्रतीच्या दुधाचे संकलन करण्यात यावे.

दुधाच्या गुणवत्तेमध्ये कुठल्याही प्रकारची तडजोड स्वीकारली जाणार नसल्याचे स्पष्ट करत जिल्ह्याचा उत्तर व दक्षिण विभागामध्ये दुधाच्या गुणवत्तेची तपासणी करण्यासाठी पथक गठित करण्यात येऊन त्यांच्यामार्फत दुधाची तपासणी करण्यात यावी. समाजातील प्रत्येकाला उच्चप्रतीचे व भेसळमुक्त दुध मिळावे याला शासनाचे प्राधान्य आहे. जिल्ह्यात दुध संकलित करण्यात येणाऱ्या दुध संकलन केंद्राची संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांनी अचानक तपासणी करावी. भेसळयुक्त दुध आढळुन आल्यास संबंधितांवर कडक कारवाई करण्याचे निर्देश विखे पाटील यांनी दिले आहेत.

देवेंद्र फडणवीस भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष होणार?

तसेच तपासणीमध्ये दुधामध्ये भेसळ आढळुन आल्यास संबंधितांवर थेट फौजदारी कारवाई करण्यात यावी. तसेच दुधसंकलन केंद्रावर दुध देणाऱ्या शेतकऱ्यांना 30 रुपये प्रतिलिटर दर देण्याचा शासनाने निर्णय घेतला आहे. जे केंद्र शेतकऱ्यांना 30 रुपयांचा दर देणार नाहीत, त्यांच्यावरसुद्धा कारवाई करण्याचे निर्देश देत प्रत्येक दुध संकलन केंद्रावर संकलित होणाऱ्या दुधाची माहिती मिळावी, यासाठी विशेष ॲप तयार करण्याच्या सुचनाही पालकमंत्री विखे पाटील यांनी यावेळी दिल्या आहेत.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img