4 C
New York

Jitendra Awhad : हल्ल्यानंतर संतापलेल्या आव्हाडांची पहिली प्रतिक्रिया म्हणाले…

Published:

ठाणे

संभाजीराजे छत्रपती (Sambhajiraje Chhatrapati) यांनी रक्त तपासून घ्यावे, या विधानानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांच्या वाहनावर दगड, काठ्यांनी हल्ला करण्यात आला. या हल्ल्याची जबाबदारी स्वराज्य संघटनेने स्वीकारली आहे. या हल्ल्यानंतर संतापलेले जितेंद्र आव्हाड यांनी आपल्या विधानावर ठाम असल्याचे स्पष्ट केले. तर हल्लेखोरांकडे माझे मी पाहून घेईन, त्यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न करेन. हा भ्याड हल्ला आहे, असे मतही आव्हाड यांनी व्यक्त केला.

जितेंद्र आव्हाड त्यांच्या गाडीतून प्रवास करत असताना 3 ते 4 हल्लेखोर आले त्यांनी गाडी फोडण्याचा प्रयत्न केला. ठाण्याच्या दिशेने आव्हाड त्यांच्या घरी निघाले होते. जितेंद्र आव्हाड यांनी संभाजीराजे छत्रपती यांचा अवमान केला, अशी भूमिका स्वराज्य संघटनेने मांडली आहे. आव्हाडांनी माफी मागावी, अशी मागणी देखील स्वराज्य संघटनेने केली होती. 

जितेंद्र आव्हाड म्हणाले की, मी घराकडे जात असताना गाडीवर दगड पडल्याचा आवाज आला. गाडी थांबवायला सांगितली, त्यानंतर हा हल्ला झालाय. संभाजी राजेंची चूक होती. विशाळगडावर जे काही झालं, ते त्यांच्या आडून झालं. त्यांची भूमिका योग्य नव्हती. राजर्षी शाहू महाराजांच्या विचारांच्या विसंगत त्यांची भूमिका होती. हे मी आज देखील सांगत आहे. राजर्षी शाहू महाराजांचं रक्त सर्वांना बरोबर घेऊन जाणारांचं रक्त होतं. त्यांचं भांडण लावणारं रक्त नव्हतं. शाहू महाराजांचा विचार एक टक्का देखील संभाजीराजेंमध्ये नाही, अशी प्रतिक्रिया आमदार जितेंद्र आव्हाड यांनी दिली आहे. 

जितेंद्र आव्हाड म्हणाले की, तू मर्द असता तर पळाला नसता, तू पळपुटा आहेस हे महाराष्ट्राला कळालं आहे असं विधान स्वराज्य संघटनेच्या पदाधिकाऱ्याने केले आहे. विशेष म्हणजे पोलिसांचं वाहन जितेंद्र आव्हाडांच्या कारमागे होते. त्यावेळी शेजारून आलेल्या वाहनातून हे कार्यकर्ते उतरले आणि त्यांनी हातातील बांबूच्या सहाय्याने आव्हाडांच्या गाडीवर हल्ला केला. त्यावेळी कार्यकर्त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज की जय असं म्हणत घोषणा दिल्या. विशालगडावर संभाजीराजे यांनी जे आंदोलन केले होते त्यावर जितेंद्र आव्हाडांनी नापसंती व्यक्त केली होती. 

काय म्हणाले होते जितेंद्र आव्हाड?

संभाजीराजेंनी आता छत्रपती म्हणणं सोडून द्यावं. त्यांना जो अधिकार होता, शाहू महाराजांची जी वंश परंपरा होती, त्या वंशाचं रक्त संभाजीराजे पुढे घेऊन जात होते. त्यांच्या रक्तात काय होते आणि संभाजीराजेंच्या रक्तात काय हे तपासण्याची गरज आहे. शाहू महाराजांच्या घराण्यातील वारस असलेला व्यक्ती असं विधान करतो, ज्यामुळे दंगल होऊ शकते तो शाहू महाराजांचा वारस होऊच शकत नाही असं विधान जितेंद्र आव्हाडांनी विशालगडावरील आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर केले होते. 

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img