19.7 C
New York

IPL 2025 : मेगा ऑक्षनपूर्वी काव्या मारनची मोठी मागणी, पहा सविस्तर

Published:

निर्भयसिंह राणे

IPL 2025 च्या मेगा ओक्षनपूर्वी मुंबईत IPL संघांच्या मालकांची बैठक झाली. या बैठकीत सर्वात मोठा मुद्दा होता की यावेळी संघ किती खेळाडूंना संघात कायम ठेवू शकेल. संघ मालक आणि BCCI अधिकाऱ्यांशी झालेल्या चर्चेत सनरायझर्स हैदराबादच्या (SRH) CEO काव्या मारन (Kavya Maran) यांनीही काही मोठ्या मागण्या केल्या आहेत. फ्रँचायझीसाठी फ्लेक्सिबिलिटी वाढवणे हा त्यांच्या मागणीचा उद्देश आहे. तसेच जे खेळाडू करणे सांगून संपूर्ण टूर्नामेंट खेळात नाहीत त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी. काव्या मारन म्हणाली की, “कोणत्याही खेळाडूने दुखापतीशिवाय इतर करणे काढली तर त्याच्यावर बंदी घातली गेली पाहिजे”.

IND vs SL : भारताविरुद्धएकदिवसीय मालिकेआधी श्रीलंकेचे स्टार गोलंदाज दुखापतग्रस्त

मेगा ओक्षनपूर्वी झालेल्या बैठकीत काव्या मारन यांचा मुख्य प्रस्ताव म्हणजे फ्रँचायझीना लिलावापूर्वी किमान सहा खेळाडूंना रिटेन किंवा राईट टू मॅचचा (RTM) पर्याय देण्यात यावा.त्यांनी सांगितले की ते अनेक प्रकारे वापरले जाऊ शकतात, जसे चार रिटेन्शन्स आणि दोन राईट टू मॅच कार्ड, सर्व सहा रिटेन्शन्स किंवा सहा RTM. मारन यांनी परदेशी खेळाडूंना कायम ठेवण्यावरील मर्यादा हटवण्याबाबतही मत व्यक्त केले. त्या म्हणाल्या,” प्रत्येक संघ वेगळ्या पद्धतीने तयार केला जातो आणि वेगवेगळ्या संघांची मुख्य ताकद वेगळी असते. काहींकडे मजबूत विदेशी खेळाडू आहेत, तर काहींकडे मजबूत कॅप्प्ड भारतीय खेळाडू आहेत आणि काहींकडे मजबूत अनकॅप्प्ड खेळाडू आहेत. आमच्या बाबतीत, परदेशी खेळाडूंचा मजबूत गाभा आहे. कॅप्प्ड, अनकॅप्प्ड आणि परदेशी खेळाडूंना कायम ठेवण्याची मर्यादा असू नये”.

अभिषेक शर्मा (Abhishek Sharma) यांचे उदाहरण देऊन त्या पुढे म्हणाल्या, ” संघ तयार करण्यासाठी खूप वेळ लागतो. तरुण खेळाडूंना परिपक्व होण्यासाठी खूप वेळेची गुंतवणूकही लागते. अभिषेक शर्माला परफॉर्मन्समध्ये सातत्य आणण्यासाठी तीन वर्षे लागली. इतर संघांमध्ये अशी अनेक उदाहराणे आहेत हे तुम्ही मान्य कराल”. लिलावात विकल्यानंतर खेळाडू खेळापासून दूर राहण्याच्या समस्येवर मारन यांनी त्या खेळाडूंवर बंदीचा प्रस्ताव मांडला. मात्र, दुखापतीमुळे खेळू न शकलेल्या नावांचा यात समावेश असणार नाही.” असं SRH CEO काव्या मारन म्हणाल्या.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img