23.1 C
New York

Anshuman Gaikwad : भारताचे माजी क्रिकेटपटू अंशुमन गायकवाड यांचं निधन

Published:

क्रिकेटच्या मैदानात परिस्थितीत कितीही कठीण असली तरी हार न मानणारे भारताचे माजी क्रिकेटपटू अंशुमन गायकवाड यांचं वयाच्या ७१ व्या वर्षी ब्लड कॅन्सरशी प्रदीर्घ लढाईनंतर निधन झालं. (Anshuman Gaikwad) आपल्या 12 वर्षाच्या कारकिर्दीत गायकवाड यांनी 40 कसोटी आणि 15 एकदिवसीय सामने खेळले, ज्यामध्ये त्यांनी 1983 मध्ये जालंधर येथे पाकिस्तानविरुद्ध 2 शतके आणि 201 च्या सर्वोच्च धावसंख्येसह 1154 धावा केल्या होत्या.

गायकवाड हे दीर्घकाळापासून ब्लड कॅन्सरने त्रस्त होते. त्यांच्यावर लंडनमध्ये उपचार सुरू होते. गायकवाड यांच्या कुटुंबीयांना उपचारासाठी नुकतेच बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी एक कोटी रुपयांची आर्थिक मदत करण्याचे आदेश दिले होते. अंशुमन गायकवाड यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील 40 कसोटी सामन्यांच्या 70 डावांमध्ये 30.07 च्या सरासरीने 1985 धावा केल्या. यामध्ये त्यांनी 10 अर्धशतके आणि 2 शतके झळकावली. त्याचबरोबर त्यांच्या नावावर 2 विकेट्सही आहेत.

महिन्याच्या पाहिल्याचं दिवशी; LPG सिलिंडर महागलं

Anshuman Gaikwad भारतीय संघाचे प्रशिक्षक म्हणूनही भूमिका

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर गायकवाड यांनी 1997 ते 1999 या कालावधीत भारतीय संघाचे प्रशिक्षक म्हणूनही भूमिका पार पाडली आहे. त्यांचे वडिल दत्ता गायकवाड यांनीही भारतीय संघाचे प्रतिनिधित्तव केले होते. विशेष अभेद्य बचावासाठी अंशुमन गायकवाड ओळखले जायचे. आपल्या १२ वर्षांच्या कारकि‍र्दीत त्यांनी १५ एकदिवसीय सामने खेळले. या काळात इतर फलंदाजांच्या छातीत धडकी भरवणाऱ्या तेजतर्रार गोलंदाजांचा अंशुमन गायकवाड मोठ्या हिमतीनं सामना करायचे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img