20 C
New York

Police Bharti : EWS अंतर्गत मराठा उमेदवारांच्या पोलीस भरतीस तात्पुरती स्थगिती

Published:

राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा सध्या चर्चेत आहे. गेल्या काही दिवसांपासून मराठ्यांना आरक्षण मिळावे यासाठी आंदोलन व उपोषणाचे हत्यार उपसण्यात आले होते. मराठा आरक्षणाचा लढा सुरू असतानाच एक मोठी बातमी समोर येत आहे. राज्यातील पोलीस भरतीत मराठा समाजातील ईडब्ल्यूएस प्रवर्गातील भावी पोलिसांची उमेदवारी स्थगित करण्यात आली आहे. ईडब्ल्यूएस प्रवर्गातील अर्ज करणाऱ्या उमेदवारांची तात्पुरती स्थगिती ठेवण्याचे आदेश 30 जुलैला अपर महासंचालक कार्यालयाकडून देण्यात आले आहेत.

मराठा समाजाचा उमेदवारांची निवड करण्याबाबत प्रवर्गाचा गोंधळ अद्याप सुरूच आहे. एसीबीसी किंवा खुला प्रवर्गापैकी एकाची निवड करण्यासंबंधात ईडब्ल्यूएस प्रवर्गातील एकाची निवड करण्याचे आदेश देण्यात आले होते. भरतीसाठी आलेल्या उमेदवाराकडून हमीपत्र घेण्याची सूचना देण्यात आल्या होत्या. मात्र नाशिकमध्ये चार उमेदवारांनी यासाठी नकार दिल्याने पेच निर्माण झाला होता. मात्र, आता शासन निर्णय होत नाही तोवर केवळ या उमेदवारांचे प्रशिक्षण स्थगित करण्याचे आदेश कार्यालयाकडून देण्यात आले आहेत.

राहुल गांधींच्या लोकसभेतील भाषणांची देशभरात चर्चा

महाराष्ट्र पोलीस दलात रिक्त पोलीस शिपाई पदाची भरती प्रक्रिया दोन महिन्यांपासून सुरू आहे. अद्याप अनेक ठिकाणी प्रक्रिया सुरू आहे. नाशिक जिल्ह्यातील शहर आणि ग्रामीण पोलीस दलातील भरती प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली आहे. मैदानी चाचणी होऊन लेखी परीक्षा पार पडल्या. त्यानंतर अंतिम निवड यादीही जाहीर झाली.

Police Bharti  धोरण निश्चितीची विनंती

‘ईडब्ल्यूएस’मधून निवड झालेल्या मराठा समाजातील उमेदवारांच्या निवडीसंदर्भात धोरण निश्चितीसाठी पोलिसांनी शासनाला विनंती केली आहे. शासन आदेश प्राप्त होईपर्यंत पोलिस शिपाई भरतीत ‘ईडब्ल्यूएस’मधून तात्पुरती निवड झालेल्यांची उमेदवारी रद्द न करता प्रकरणे स्थगित ठेवावीत. मात्र, इतर प्रवर्गातील उमेदवारांच्या नियुक्तीची कार्यवाही पूर्ण करावी, असे अपर पोलिस महासंचालक कार्यालयाने स्पष्ट केले आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img