26.6 C
New York

UPSC : प्रीती सुदान UPSC च्या नव्या अध्यक्ष

Published:

वादग्रस्त IAS अधिकारी पूजा खेडकर प्रकरणामुळे केंद्रीय लोकसेवा आयोग (UPSC) सध्या देशभरात चर्चेत आहे. याच आयोगाचे अध्यक्ष मनोज सोनी यांनी (Manoj Soni) कार्यकाळ पूर्ण होण्याआधीच राजीनामा दिला होता. सन 2029 मध्ये त्यांचा कार्यकाळ पूर्ण होणार होता. मात्र त्याआधीच त्यांनी राजीनामा दिला. त्यांच्या राजीनाम्यानंतर युपीएससीचा अध्यक्ष कोण होणार असा प्रश्न सातत्याने विचारला जात होता. आता या प्रश्नाचं उत्तर मिळालं आहे. 1983 बॅचच्या आयएएस अधिकारी आणि माजी केंद्रीय आरोग्य सचिव प्रीती सुदान यांना युपीएससीच्या अध्यक्षपदी नियुक्त करण्यात आले आहे.

प्रीती सुदान उद्या आपल्या अध्यक्षपदाचा पदभार स्वीकारतील. एक महिना आधी तत्कालीन अध्यक्ष मनोज सोनी यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. सोनी यांचा कार्यकाळ 2029 मध्ये संपणार होता. मात्र त्याआधीच त्यांनी राजीनामा दिला. देशात पूजा खेडकर प्रकरण चर्चेत असतानाच सोनी यांनी राजीनामा दिल्याने त्यांच्या राजीनाम्याच्या टायमिंगवर प्रश्न उपस्थित केले जात होते. त्यांच्या राजीनम्यानंतर प्रीती सुदान युपीएससीच्या नव्या अध्यक्ष असताल. सुदान 1 ऑगस्ट रोजी अध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारतील. सुदान सन 2022 पासून युपीएससीच्या सदस्य म्हणून कार्यरत आहेत. आता त्यांना अध्यक्ष म्हणून काम करण्याची संधी मिळाली आहे. केंद्र सरकारच्या बेटी बचाओ बेटी पढाओ आणि आयुष्मान भारत या योजना सुरू करण्यासह राष्ट्रीय चिकित्सा आयोग, संबद्ध स्वास्थ्य पेशेवर आयोग आणि ई सिगरेट प्रबंधन संबंधी कायदे बनविण्यात त्यांनी योगदान दिले आहे.

पुण्यात झिकाच्या रुग्णसंख्येत होतीये मोठी वाढ

UPSC कोण आहेत प्रीती सुदान?

प्रीती सुदान या आंध्र प्रदेश कॅडरच्या (1983) सेवानिवृत्त आयएएस अधिकारी आहेत. केंद्रीय आरोग्य सचिव म्हणून त्यांचा कार्यकाळ जुलै 2020 मध्ये संपला होता. महिला आणि बालविकास मंत्रालयासह त्यांनी रक्षा मंत्रालयातही काम केलं आहे. सुदान या त्यांच्या कॅडर राज्य आंध्र प्रदेशात अर्थ, योजना, आपत्ती निवारण, पर्यटन आणि कृषी विभागांच्या प्रभारी राहिल्या आहेत. सुदान यांनी जागतिक बँकेसाठी सल्लागार म्हणूनही काम केले आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img