3.6 C
New York

Pravin Darekar : उद्धव ठाकरेंनी फडणवीसांना चॅलेंज देताच प्रवीण दरेकर, म्हणाले..

Published:

मुंबई

आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी (Assembly Elections) आज शिवसेना ठाकरे गट प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी मुंबईतील (Mumbai) शाखाप्रमुखांची बैठक घेतली होती. या बैठकीत बोलताना उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर जोरदार टीका केली आहे. तर आता उद्धव ठाकरे यांच्या या टीकेला भाजपाकडून (BJP) प्रवीण दरेकर (Pravin Darekar) यांनी जोरदार प्रत्युत्तर देण्यात आले आहे.

प्रवीण दरेकर म्हणाले की, अत्यंत पोकळ प्रकारचा आव्हान आहे. देवेंद्र जी ने महाराष्ट्राचा राजकारण समर्थपणे केला आहे. पाच वर्ष उत्तम मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र जी ने काम केला आहे. तर आता दोन्ही पक्षांनासोबत घेऊन जनतेच्या हितासाठी काम करत आहे. त्यामुळे पवार साहेब असतील किंवा उद्धव साहेब असतील यांना देवेंद्र फडणवीसांबद्दल कमालीचा दोष आहे. त्यामुळे अशा प्रकारचे भावना त्यांच्यामधून उठत असतात.

देवेंद्र जी वर दोषाने बोल्याशिवाय त्यांच्या मनाचा समाधान होत नाही. त्यामुळे सभा किंवा मेळाव्यात देवेंद्र फडणीसांवर बोलून त्यांच्या मनातील राग भागून घेतात. मात्र देवेंद्र फडणवीस कधीही नाक्या वरच्या भांडणासारखे कधीही बोलत नाही. ते महाराष्ट्राचे एक सुसंस्कृत राजकारणी आहे. ते अरे ला कारे ते करत नाही. उद्धव ठाकरे यांचा भाषण महाराष्ट्राच्या राजकारणाला शोभा देणारा नाही. अशी प्रतिक्रिया माध्यमांशी बोलताना प्रवीण दरेकर यांनी दिली.

उद्धव ठाकरे यांचे व्यक्तव्य हेच गुर्मी आहे आणि जे गुर्मीत बोलतोय त्याने गुर्मी उतरायची भाषा करणे म्हणजे योग्य नाही. पराभवाला यश म्हणून ढोल पिटवण्याचा काम ठाकरेंकडून सुरु आहे. मोदी जी तिसऱ्यांदा देशाचे पंतप्रधान झाले आहे. ही वस्तुस्थिती आहे. विधानसभा निवडणुकीत कळेल कोण कोणाची जिरवते. असं देखील प्रवीण दरेकर म्हणाले.

उद्धव ठाकरे काय म्हणाले

आता विधानसभा निवडणुकीत भाजपची उरली सुरली गुर्मीही उतरवू. सगळं सहन करून मी पुन्हा उभा राहिलो. यापुढे राजकारणात एकतर ते तरी राहतील किंवा मी राहिल, असं उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले. तसेच त्यांनी मला आणि आदित्य ठाकरेला अडचणीत आणण्याचे षडयंत्र कसे रचले गेले होते, हे अनिल देशमुख यांनी सांगितले आहेत. सगळं सहन करून मी हिंमतीने उभा राहिलो आहे त्यामुळे राजकारणात एकतर ते राहतील किंवा मी राहीन. आज माझ्याकडे पक्ष, चिन्ह आणि पैसे नाही मात्र फक्त शिवसैनिकांच्या हिंमतीवर आव्हान देत आहे. असं उद्धव ठाकरे म्हणाले होते.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img