8.3 C
New York

Jay Malokar Death : अजित पवारांवर हत्येचा गुन्हा दाखल करा; मनसेच्या ‘या’ नेत्याची मागणी

Published:

छत्रपती संभाजीनगर

अकोल्यात राष्ट्रवादीचे विधान परिषद आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांची गाडीवर मनसैनिकांनी फोडली. राष्ट्रवादी-मनसे कार्यकर्त्यांच्या हमरीतुमरीनंतर अस्वस्थ वाटत असल्याने मनसैनिक (MNS) जय मालोकार (Jay Malokar Death) यांना रुग्णालयात नेण्यात आलं, परंतु त्यांचा मृत्यू झाला. या घटनेवरुन मनसे नेते प्रकाश महाजन (Prakash Mahajan) आक्रमक झाले आहेत. अजित पवार (Ajit Pawar) सुपारीबाज नेते असून त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा, अशी मागणी महाजनांनी केली. यावर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना राग आला, तर माझ्याकडे गाडी नाहीये, पण माझी स्कूटर फोडा, अशा शब्दात त्यांनी चॅलेंजही दिलं.

प्रकाश महाजन म्हणाले की, साधी गाडी फोडली तर उमेश पाटील म्हणतात, राज ठाकरेंना अटक करा, खटला भरा, मग एखादा मृत्यू झाला तर यांच्या नेत्यांना जबाबदार धरलं पाहिजे. त्यामुळे अजित पवारांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा ही मागणी करतोय असं सांगत मनसे नेते प्रकाश महाजन यांनी संतप्त भूमिका मांडली आहे. अमोल मिटकरींनी तोंडाला संयम ठेवावा असे अजित पवारांनी मागे सांगितले होते. त्यांनी संयम सोडला त्यामुळे आमच्या तरूण कार्यकर्त्याचा नाहक बळी गेला.

प्रकाश महाजन म्हणाले की, राज ठाकरेंवर टीका केल्याच्या रागातून कार्यकर्ते जाब विचारायला गेले असता झालेल्या बाचाबाचीचं पर्यवसन मिटकरींच्या गाडीवर दगडफेक करण्यात झालं. त्याचं समर्थन कुणी करत नाही, पण याचा तणाव येऊन आमच्या तरुण कार्यकर्त्याचा हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू झाला. कारण मिटकरी स्वतः पोलीस स्टेशनमध्ये बसले होते, आणि कारवाई करा म्हणून ठिय्या मांडला होता. माझं उलट म्हणणं आहे की अमोल मिटकरी, त्यांच्या पक्षाचे प्रवक्ते उमेश पाटील आणि पक्षाचे सर्वोच्च नेते अजित पवार यांच्यावर महाराष्ट्र सरकारने सदोष मनुष्यवधाचा गुन्हा त्वरित दाखल करावा, अशी मागणी प्रकाश महाजन यांनी केली.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img