23.1 C
New York

OBC Reservation : …तोच पक्ष आता सत्तेत राहील – प्रकाश शेंडगे

Published:

रमेश औताडे, मुंबई

ओबीसी समाजाचा आरक्षणाचा (OBC Reservation) प्रश्न जो कोणी सोडवेल तोच पक्ष आता सत्तेत राहील. असे स्पष्ट करत ओ बी सी बहुजन पार्टी चे संस्थापक अध्यक्ष प्रकाश शेंडगे (Prakash Shendge) यांनी आगामी विधानसभा निवडणुकीचे (Assembly Elections) रणशिंग फुंकले आहे. बुधवारी मुंबई मराठी पत्रकार संघ येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

सांगली येथे ११ ऑगस्ट ला सर्व ओ बी सी नेत्यांना घेऊन एका विराट सभेचे आयोजन करण्यात आले आहे. आगामी विधानसभेसाठी ओ बी सी समाज मतपेटीतून काय जादू करणार आहे हे लवकरच कळेल. लोकसभा व विधानसभेच्या निवडणुका यांच्यात बेरजेचे गणित वेगळे असते. त्यामुळे आता ओ बी सी समाजाला विश्वासात घेतल्याशिवाय कोणताही पक्ष सत्तेत जाऊ शकणार नाही असे शेंडगे यावेळी म्हणाले.

मराठा समाजाकडे जे सी बी मधून फुले उधळण्या सारखी परिस्थिती आहे. आमचा समाज पोटाची खळगी भरण्यासाठी रोजंदारीवर जातो. त्यामुळे आम्ही मराठा समाजाऐवढे मोठे आंदोलन करू शकत नसलो तरी मतपेटीतून आमची ताकत आता सरकारला दिसेल. मराठवाड्यात ४६ जागा विधानसभेसाठी निश्चित केल्या आहेत. उर्वरित जागेसाठी पक्ष्याची बैठक घेऊन निर्णय घेण्यात येणार आहे. असेही शेंडगे यावेळी म्हणाले.

निजाम नोंदी व पेशवेकालीन नोंदी तपासून कुणबी दाखले देण्यासाठी वेळ लागेल म्हणून डिसेंबर पर्यंत शिंदे समितीला मुदतवाढ दिली आहे ती चुकीची असून, ५० टक्के वरील टिकणारे कायद्याचे आरक्षण मराठा समाजाला द्यावे. ओ बी सी च्या आरक्षणात वाटा घेऊ नये. असे साधे सरळ गणित असताना राजकारण करू पाहणारे कायदा सुव्यवस्था धोक्यात आणत आहेत.असेही शेंडगे यांनी सांगितले.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img