21 C
New York

Mahavikas Aghadi : ‘मविआ’मध्ये जागा वाटपाबाबत हालचालींना वेग, काँग्रेसनेते मातोश्रीवर, काय ठरलं?

Published:

मुंबई

आगामी विधानसभा निवडणुकीच्या (Assembly Elections) पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी तयारी सुरू केली आहे. लोकसभा निवडणुकीमध्ये राज्यात मोठ्या प्रमाणात यश मिळालेल्या महाविकास आघाडीने (Mahavikas Aghadi) देखील आगामी विधानसभा निवडणुकी करिता तयारी सुरू केली आहे. या स्पर्शभूमीवर महाविकास आघाडीच्या जागा वाटपा संदर्भात आज काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची मातोश्री निवासस्थाने भेट घेतली तसेच जागा वाटपासंदर्भात चर्चा केली आहे.

काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी मातोश्रीवर जावू उद्धव ठाकरे यांची भेट घेतली आहे. या भेटीत मविआच्या जागा वापची चर्चा सुरू झाली पाहीजे यावर बोलणी झाली. दोन्ही नेत्यांनी लवकर जागा वाटप झाले पाहीजे यावर सहमती दर्शवली आहे. त्यानुसार 7 ऑगस्टला जागा वाटपाची चर्चा करण्यासाठी बैठक होणार आहे. ही बैठक मुंबईत होईल. या बैठकीला मविआचे प्रमुख नेते उपस्थित राहातील अशी माहिती थोरात यांनी भेटीनंतर दिली.

या बैठकीत जागा वाटपावर चर्चा होणारच आहे. याशिवाय या पुढचा मविआचा अजेंडा काय असेल याचीही रणनिती आखली जाणार आहे. महायुतीची रणनिती काय असेल त्याला कशा पद्धतीने तोंड द्यावे लागेल याचाही आढावा घेतला जाईल. शिवाय महाविकास आघाडीमध्ये जे समन्वयक आहेत त्याची ही बैठक मुंबईत असेल. दरम्यान उद्धव ठाकरे यांच्या भेटीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि नाना पटोले यांच्या बरोबरही फोन वरून चर्चा झाल्याचं थोरात यांनी सांगितलं

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img