मुंबई
झारखंडचे राज्यपाल सी.पी राधाकृष्णन (CP Radhakrishnan) यांनी महाराष्ट्राचे नवे राज्यपाल (Maharashtra Governor) पदाची शपथ घेतली. मुंबई उच्च न्यायालयचे मुख्य न्याय मूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय यांनी त्यांना शपथ दिली. सी पी राधाकृष्णन आधी झारखंड राज्याचे राज्यपाल होते. त्यांच्या जागी आता भाजपचे ज्येष्ठ नेते संतोषकुमार गंगवार हे झारखंडेच राज्यपाल असतील. राष्ट्रपती भवनाने शनिवारी रात्री अनेक राज्यांच्या राज्यपालांच्या नियुक्त्यांची घोषणा केली. दरम्यान सी पी राधाक्रुष्णन राज्याचे नवे राज्यपाल बनले आहेत. नवनियुक्त राज्यापालांनी राज्यपाल पदाची शपथ घेतली. या नियुक्तीसह राधाकृष्णन है महाराष्ट्राचे 24 वे राज्यपाल बनले आहेत.
आगामी काळात महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका होणार आहेत. त्यासाठी राधाकृष्णन यांना राज्यपालपदी बसवण्यात आले आहे. दरम्यान सीपी राधाकृष्णन हे दीर्घकाळ भाजपचे सदस्य होते. तामिळनाडूच्या कोईम्बतूर लोकसभा मतदारसंघातून ते दोनदा खासदार म्हणून निवडून आले होते. ते तामिळनाडूमध्ये भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष राहिले आहेत. राधाकृष्णन यांनी १९९८ आणि १९९९ च्या लोकसभा निवडणुकीत विजय मिळवला होता. २०१४ आणि २०१९ च्या निवडणुकीतही भाजपने त्यांना उमेदवारी दिली होती, त्यावेळी त्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता. ते १८ फेब्रुवारी २०२३ रोजी ते झारखंडचे राज्यपाल झाले होते.
सीपी राधाकृष्णन हे दीर्घकाळ भाजपचे सदस्य होते. तामिळनाडूच्या कोईम्बतूर लोकसभा मतदारसंघातून ते दोनदा खासदार म्हणून निवडून आले. ते तामिळनाडूमध्ये भाजपचे प्रदेशाध्यक्ष राहिले आहेत. सी.पी राधाकृष्णन यांची महाराष्ट्राचे नवे राज्यपाल म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. राधाकृष्णन हे विद्यमान राज्यपाल रमेश बैस यांची जागा घेतील. राधाकृष्णन हे सध्या झारखंडचे राज्यपाल आहेत. त्याचवेळी महाराष्ट्राचे माजी विधानसभा अध्यक्ष आणि भाजपचे ज्येष्ठ नेते हरिभाऊ बागडे यांची राजस्थानचे राज्यपाल करण्यात आले आहे.
सीपी राधाकृष्णन कोण आहेत?
67 वर्षीय सी.पी. राधाकृष्णन हे मूळचे तामिळनाडूचे आहेत. त्यांचा जन्म 4 मे 1956 रोजी तिरुपूर येथे झाला. वयाच्या 16 व्या वर्षापासून ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी जोडले गेले आहेत. राधाकृष्णन हे कोईम्बतूर मतदारसंघातून दोनदा लोकसभेवर निवडून गेले होते. ते भाजपचे तामिळनाडू प्रदेशाध्यक्षही राहिले आहेत. 2004 ते 2007 पर्यंत त्यांनी तामिळनाडूची कमान सांभाळली. राधाकृष्णन हे प्रदीर्घ काळ भाजपचे सदस्य होते. 2014 आणि 2019 च्या निवडणुकीतही भाजपने त्यांना उमेदवारी दिली, मात्र त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले. 18 फेब्रुवारी 2023 रोजी ते झारखंडचे राज्यपाल झाले.