26.6 C
New York

Weather Update : ‘या’ जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा अलर्ट

Published:

मुंबई पुण्यासह राज्यात अनेक ठिकाणी धुमाकूळ (Weather Update) घातल्यानंतर मागील दोन ते तीन दिवसांपासून पावसाने (Rain Alert) थोडी विश्रांती घेतली होती. परंतु, आता 1 ऑगस्टपासून पाऊस पुन्हा जोर धरण्याची शक्यता दिसू लागली आहे. उद्यापासून पुढील दोन ते तीन दिवस मुंबईसह ठाणे, पालघर जिल्ह्यांत मुसळधार पाऊस होईल असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. रायगड आणि रत्नागिरी या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. दक्षिण कोकणात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. पालघर आणि ठाणे जिल्ह्यासाठी शनिवारी ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.

पुणे, कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्यांतील (Satara News) घाट माथ्यानर अतितीव्र पाऊस होईल असाही अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. मागील आठवड्यात किनारपट्टीला समांतर कमी दाबाचा पट्टा सक्रिय झाला होता. त्यामुळे मुंबईसह राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस झाला होता. आता हा पट्टा ओसरल्याने पावसाचा जोरही कमी झाला आहे. आता अरबी समुद्र आणि सौराष्ट्राच्या भागात चक्राकार वाऱ्याची स्थिती आहे. त्यामुळे मुंबईसह (Mumbai Rains) राज्याच्या अनेक भागात मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. उत्तर महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यातील (Nashik News) घाट परिसरात शनिवारी मुसळधार ते अतिमुसळधार (Heavy Rain) पावसाची शक्यता आहे. याच काळात मुंबईत तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. या काळात जोरदार पाऊस होणार असल्याने नदीकाठच्या भागात राहणाऱ्या नागरिकांनी आवश्यक सावधानता बाळगावी असे आवाहन करण्यात आले आहे.

धबधबे पाहण्यासाठी लोकांना उत्साह असतो. पण त्यांना माझं आवाहन आहे की, २ दिवस तिथे जाऊ नका. नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने जिल्ह्यातील काही भागातील वाहतूक बंद करण्यात आली. नागरिकांनी आवश्यक असेल तरच घराबाहेर पडावं. शक्यतो, घराबाहेर पडू नका, काळजी घ्या, असंही आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. दरम्यान, मागील आठवड्यात पुण्यातील धरण क्षेत्रात मोठ्या प्रमाणात पाऊस पडल्याने खडकवासला धरणाच्या सांडव्यातून पुण्यात मुठा नदी पात्रामध्ये ४० हजार क्युसेक वेगाने पाणी सोडण्यात आलं होतं. त्यामुळे मुठा नदीला पूर येऊन डेक्कन, सिंहगड रोड, एकता नगर, पुलाची वाडी या भागात पाणी शिरलं. अचानक पाणी वाढल्याने नागरिक घरातच अडकून पडले. अनेक घरांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान देखील झाले. दरम्यान, पुणे शहरासह लगतच्या गावांनाही फटका बसला होता. अनेक ठिकाणी पाणी साचल्याच्या घटना समोर आल्या होत्या.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img