23.1 C
New York

ED Raids : मनी लाँड्रींगप्रकरणी ईडीकडून पुणे, बारामतीसह मुंबईत धाडसत्र

Published:

मुंबई

मनी लॉंडरिंग (Money Laundring) प्रकरणात महाराष्ट्रात ईडीकडून (ED Raids) धाडसत्र सुरू आहे. ईडी कडून आज राज्यात पुणे, बारामती, कर्जतसह मुंबईत विविध ठिकाणी धाडी टाकल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे युवा नेते त्याचा आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांच्या संबंधित असलेल्या एका कंपनीतही सर्च ऑपरेशन सुरू असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

ईडीकडून मनी लाँड्रींग प्रकरणी पुण्याच्या एम. एस. शिव पार्वती साखर कारखाना आणि इतर कंपन्यांच्या खात्यात पैशांचा गैरव्यवहार झाल्याच्या आरोपाखाली ईडीकडून सर्च ऑपरेशन राबवण्यात आले. एम/एस. हायटेक इंजीनियरिंग कॉर्पोरेशन इंडिया प्रा.लि. आणि त्यांचे व्यवस्थापक नंदकुमार तासगांवकर, संजय आवटे आणि राजेंद्र इंगवाले यांच्या बँक लोन फसवणूकप्रकरणी हे अभियान राबवण्यात आलं आहे.

ईडीच्या या छापेमारीत अनेक संशयास्पद कागदपत्र डिजिटल पुरावे आणि  19.50 लाख रुपये जप्त करण्यात आले आहेत. सीबीआयने या प्रकरणात सर्व प्रथम गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्यांच्या आधारे ईडीने पुढे तपास सुरू केला आहे. या कंपन्यांनी 100 कोटीचं कर्ज घेतलं होतं. मात्र, कर्ज मिळवण्याच्या अटीनुसार प्रकल्पासाठी 71 कोटी रुपये दिले नाहीत, असे ईडीच्या तपासात समोर आले आहे. तसेच, कर्ज स्वरुपात घेतलेली रक्कम इतर कंपन्यांच्या खात्यात वळती करण्यात आली आहे. त्यानुसार ईडीकडून पुढील तपास केला जात आहे. 
 
हायटेक इंजिनीअरिंग कंपनीची सहकारी कंपनी म्हणून तासगावकर कंस्ट्रक्शन काम करत असल्याचा ईडीचा दावा आहे. रोहित पवार यांच्या बारामती अग्रो कंपनीने खरेदी केलेल्या कन्नड सहकारी साखर कारखान्याच्या लिलाव प्रक्रियेत हायटेक इंजिनीअरिंग कंपनीचे नाव आले होते. या लिलाव प्रक्रियेत रोहित पवार यांनी हायटेक इंजिनीअरिंग कंपनीची मदत घेतल्याचा संशय ईडीकडून व्यक्त करण्यात येत होता.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img