बुलढाणा
बुलढाण्यात खळबळ उडवून देणारी घटना घडली आहे. भाजपच्या (BJP) आमदार श्वेता महाले (Shweta Mahale) यांच्या अंगरक्षकाने (Bodyguard Suicide) स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केल्याची घटना आज घडली आहे. अंगरक्षकाने आत्महत्या केल्यामुळे बुलढाण्यात खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अजय गिरी असं या अंगरक्षकाचं नाव आहे. ते काही दिवसांपूर्वीच भाजप आमदार श्वेता महाले यांच्या सुरक्षेसाठी दाखल झाले होते. ते श्वेता महाले यांचे अंगरक्षक म्हणून काम करत होते. ते अशाप्रकारचा टोकाचा निर्णय घेतील, असं कुणाला वाटलं देखील नव्हतं. अजय गिरी हे बुलढाण्यातील पोलीस वसाहतीत वास्तव्यास होते. ते कुटुंबासह राहत होते. या दरम्यान त्यांनी आज अचानक स्वत:चं आयुष्य संपवलं आहे.