8 C
New York

Bigg Boss OTT3: महाअंतिम सोहळ्यापूर्वी लवकेश कटारियासह ‘हा’ स्पर्धक घराबाहेर

Published:

Bigg Boss OTT3: महाअंतिम सोहळ्यापूर्वी लवकेश कटारियासह (Lavkesh Katariya) ‘हा’ स्पर्धक घराबाहेर बिग बॉस ओटीटीचे तिसरे पर्व (Bigg Boss OTT3) आता शेवटच्या टप्प्यात आलं असून लवकरच या पर्वाचा विजेता कोण असणार हे आता लवकरच समजणार आहे. महाअंतिम सोहळा जवळ आलेला असून लवकेश कटारिया आणि अरमान मलिक (Arman Malik) बिग बॉस(Bigg Boss OTT3) च्या घरातून बाहेर पडले आहेत.

Bigg Boss OTT3: बिग बॉसच्या घरात स्पर्धकांना टॉर्चर असा टास्क देण्यात आला. यामध्ये नॅझी, रणवीर शौरी आणि कृतिका मलिक यांनी हा टास्क जिंकला तर लवकेश कटारिया, सना मकबूल, आणि साई केतन हे टास्क जिंकू न शकल्यामुळे बिग बॉसमधून बाहेर जाण्यासाठी नॉमिनेट झाले. या यादीमध्ये अरमान मलिकचं देखील नाव होते. कारण अरमानने विशाल पांड्येला कानाखाली मारल्यानंतर बिग बॉसने शिक्षा म्हणून त्याला संपूर्ण पर्वासाठी नॉमिनेट केले होते. आणि आता अरमान मलिक आणि लवकेश कटारिया बिग बॉसच्या घरातून बाहेर पडले आहे. दरम्यान, या संपूर्ण पर्वात अरमान मलिक विविध कारणांमुळे मोठ्या चर्चेत राहिलेला आहे.

‘या’ कारणांमुळे अरमान मलिक चर्चेत
युट्यूबर अरमान मलिकने बिग बॉसच्या घरात प्रवेश केल्यापासून खूप जास्त चर्चेत आहे. अरमान आणि त्याच्या दोन्ही पत्नी असे तिघही सातत्याने चर्चेत असतात. अरमान त्याच्या दोन्ही पत्नींबरोबर बिग बॉसमध्ये गेल्यानंतर सोशल मीडियावर बहुपत्नीत्वाचा वाद चांगलाच रंगला होता. त्याची पहिली पत्नी पायल मलिक जेव्हा बिग बॉसमधून घराबाहेर पडली तेव्हा आम्ही तिघे एकत्र खूश आहोत, असे तिने म्हंटल होतं मात्र काही दिवसांनंतर, तिने युट्यूब व्हिडीओमध्ये असं सांगितलं की, जेव्हा अरमान आणि क्रितिका बिग बॉसच्या घरातून बाहेर पडतील तेव्हा मी त्या दोघांशी बोलून अरमानपासून वेगळं होण्याचा निर्णय घेईन. ते दोघे आता बिग बॉसच्या घरात आहेत, त्यांना हे माहीत नाही की बाहेरच्या जगात काय सुरु आहे. लोक मला किती वाईट प्रकारे बोलत आहेत. माझा तिरस्कार करीत आहेत. एका घरात दोन बायका असतील, तिघांचा संसार असेल, तर ते लोकांना पटत नाही. याचा मला आता खूप जास्त त्रास होतोय आणि पुढे मुलांनासुद्धा होईल. लोकांना जे वाटेल ते बोलतील. मला ते सगळं नको आहे. त्यामुळे जेव्हा क्रितिका आणि अरमान बाहेर येतील, तेव्हा आम्ही वेगळे राहू, असं पायलने म्हंटल होतं. अरमान मलिकने यावर प्रतिक्रिया देत म्हटलं होते की, “ती तिची निवड आहे. तिची मर्जी आहे. जर तिला घटस्फोट हवा असेल, तर मी तिच्या निर्णयाला पूर्ण पाठिंबा देईन. पण आम्ही जेव्हा बाहेर जाऊ, त्यानंतर या सर्व गोष्टी बघू. यातून काहीतरी मार्ग काढण्याचा प्रयत्न करू. कारण-आमच्या तिघांचे नाते खूपचं मजबूत आहे. देव खाली जरी आला तरी तो आम्हाला वेगळं करू शकत नाही”, असे त्याने म्हटले होते.

निक्कीने ‘त्या’ अभिनेत्रीची काढली थेट अक्कल!

Bigg Boss OTT3: दरम्यान, नुकतंच मुनव्वर फारुकी (Munavvar Faruquie) घरामध्ये गेला होता. त्यावेळी कृतिका मलिकने मुन्नवर फारुकीसोबत संवाद साधताना ती भावूक झाल्याचे पाहायला मिळालं होतं. मुन्नवरबरोबर बोलताना कृतिकाने म्हटले आहे की, आम्ही तिघांनी जो कठीण काळ बघितला आहे, तो मला परत बघायचा नाही. मला माहित नाही, बाहेर काय चालले आहे. मला पायल आणि मुलांची काळजी वाटत आहे. असे तिने म्हटले होते.आता अरमान मलिक आणि लवकेश कटारिया बाहेर पडल्यानंतर बिग बॉस ओटीटीच्या तिसऱ्या पर्वाच्या ट्रॉफीवर कोणता स्पर्धक आपलं नाव कोरणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img