10.6 C
New York

Bigg Boss Marathi 5: “तंगड्या वर करून झोपते” निक्कीकडून वर्षा उजगांवकरांचा अपमान; अभिनेत्रीचा संताप

Published:

Bigg Boss Marathi 5: ‘बिग बॉस मराठी’च्या नव्या पर्वाला (Bigg Boss Marathi 5) चार दिवसाआधी सुरुवात झाली. ‘बिग बॉस मराठी’च्या घरात पहिल्या दिवसापासूनच निक्की तांबोळी (Nikki Tamboli) आणि वर्षा उसगावकर (Varsha Usgoankar) यांच्यातला वाद चर्चेत आला. अगदी शुल्लक कारणांवरून निक्की आणि वर्षा यांच्यात वाद होताना दिसत आहेत. आधी मेकअवरुन आणि त्यानंतर बिग बॉसचा नियम ब्रेक केल्याने वर्षा उसगावकर यांच्याबरोबर निक्कीने वाद घातला. पण, यावेळी निक्कीची जीभ जास्तच घसरली आणि तिने वर्षा उसगावकर यांचा उल्लेख अरे तुरे म्हणून करत त्यांची अक्कल काढली.

Bigg Boss Marathi 5: ‘बिग बॉस मराठी’च्या घरातील स्पर्धक निक्की आणि वर्षा उसगावकर यांचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर सर्वच स्तरातून यावर जास्त प्रमाणात प्रतिक्रिया येत आहेत. आता मराठी अभिनेत्री प्रणित हट्टे (Pranit Hatte) हिनेदेखील यावर तिचं मत मांडलं आहे. प्रणित हट्टेने तिच्या इन्स्टाग्रामवरुन एक व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये ती म्हणतेय, पहिली गोष्ट म्हणजे “ज्याप्रकारे निक्की वर्षा मॅमशी बोलत होती. ते खरंच खूप धक्कादायक होतं. जी कोणी असेल निक्की …मात्र, आपण आपल्या सिनियरबरोबर कसं वागलं पाहिजे कसं बोललं पाहिजे याचा एक सेन्स असतो. दुसरी गोष्ट म्हणजे, झालेल्या पूर्ण एपिसोडमध्ये तुम्ही पाहिलं असेल तर तुमच्या लक्षात येईल की फक्त वर्षा मॅम सोफ्यावर बसलेल्या नव्हत्या. तर बाकीचे सदस्यही गार्डन एरिया आणि इतर ठिकाणी सोफ्यावरचं बसले होते”.

कोकण हार्टेड गर्ल आणि निक्की यांच्यात कडाक्याचं भांडण;

Bigg Boss Marathi 5: “आणि तिसरी गोष्ट म्हणजे, तंगड्या वर करून कॅमेरासमोर झोपते… हे वाक्य किती किळसवाणं आहे. किती घाण वाटत आहे हे ऐकायला सुद्धा. आणि आता मला हे बघायचं आहे की रितेश देशमुखची यावर काय प्रतिक्रिया असेल. कारण, घरात सिनियर लोकांना असं बघताना आणि त्यांना अशी वागणूक मिळतेय हे बघताना वाईट वाटतंय. आणि घरामधलं कोणीतरी याबाबत बोललं पाहिजे. तिकडे घरातील सर्व सदस्य तोंड बंद करून बसले होते. एकामध्येसुद्धा निक्कीला काहीच बोलायची हिंमत नव्हती की तू चुकीचं बोलतेस”, असं म्हणत प्रणित हट्टेने संताप व्यक्त केला आहे.

‘बिग बॉस मराठी’च्या घरात नेमकं घडलं काय?
काल झालेल्या एपिसोडमध्ये बिग बॉसने सर्व सदस्यांना बेडवर झोपता येणार नाही असं सांगितलं होतं. मात्र, काही सदस्यांनी नियम भंग केल्याने बिग बॉसने सदस्यांना बेड देता येणार नाही, असं सांगितलं. त्यावरुन निक्की आणि वर्षा उसगावकर यांच्यात जोरदार वाद झाला. त्यानंतर दोघींच्या वादामध्ये निक्कीने वर्षा यांची अक्कलचं काढली.

दरम्यान, आज ‘बिग बॉस मराठी’च्या घरात पहिलं नॉमिनेशन पार पडणार आहे. यावेळी देखील निक्की व वर्षा उसगांवकर यांच्यामधील शाब्दिक वाद पाहायला मिळणार आहेत तर दुसरीकडे निक्कीचं कोकण हार्टेड गर्ल म्हणजे अंकिता वालावलकर हिच्यासोबत सुद्धा कडाक्याचं भांडण पाहायला मिळणार आहे. आता पहिल्याच आठवड्यात कोण-कोण घराबाहेर जाण्यासाठी नॉमिनेट होणार, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img