Bigg boss marathi5: ‘बिग बॉस मराठी’ (Bigg boss marathi5) छोट्या पडद्यावरील अत्यंत वादग्रस्त आणि तितकाच लोकप्रिय रिअॅलिटी शोला नुकतीच सुरुवात झाली आहे. अभिनेता रितेश देशमुख (Ritesh Deshmukh) यंदाच्या पर्वाच सूत्रसंचालन करत असून घरातील सर्व स्पर्धकांनी शोची उत्सुकता वाढवली आहे. यंदा बिग बॉसच्या घरामध्ये बरेच सोशल मीडिया स्टार स्पर्धक म्हणून सहभागी झाले आहेत. बिग बॉस हा शो त्यातील टास्कशिवाय अपूर्ण आहे. स्पर्धकांना जर घरात टिकून राहायचं असेल तर हुशारीने टास्क खेळावेच लागतात. ग्रँड प्रीमियरपासूनच ‘बिग बॉस’ स्पर्धकांना पेचात पाडत आहे. ‘बिग बॉस मराठी’च्या नव्यापर्वामध्ये पहिल्या एपिसोडपासून वाद, भांडण, राडे, धमाल, मजा-मस्ती हे सर्व पहायला मिळत असून प्रेक्षकांचं भरभरून मनोरंजन होत आहे. ‘बिग बॉस मराठी’ सुरू होऊन फक्त चार दिवस पूर्ण झाले असून चौथ्या दिवशीच घरात पहिलं नॉमिनेशनची प्रक्रिया पार पडणार आहे.
Bigg boss marathi5: ‘बिग बॉस मराठी’५ च्या नवीन एपिसोडमध्ये आज नॉमिनेशन कार्याचा शुभारंभ होणार आहे. सोशल मीडियावर याबाबतचा प्रोमोदेखील पोस्ट करण्यात आला आहे. ‘नॉमिनेशनची तोफ’ असं या पहिल्या नॉमिनेशन प्रक्रियेचं नाव आहे. ‘बिग बॉस’ने प्रतिस्पर्ध्याला घराबाहेर काढण्यासाठी ‘नॉमिनेशन तोफ’ या कार्याचा अवलंब केला आहे. पहिल्याच कार्यादरम्यान ‘कोकण हार्टेड गर्ल’ म्हणजेच अंकिता वालावलकर (Ankita Walawalkar) आणि हिंदी मनोरंजनसृष्टीमधली लोकप्रिय अभिनेत्री निक्की तांबोळी (Nikki Tamboli) यांच्यात कडाक्याचं भांडण झालेलं पाहायला मिळणार आहे.
महाअंतिम सोहळ्यापूर्वी लवकेश कटारियासह ‘हा’ स्पर्धक घराबाहेर
Bigg boss marathi5: नवीन प्रोमोमध्ये पाहायला मिळतंय की, अंकिता आणि निक्कीमध्ये टास्कसाठी भिडताना धक्काबुक्की आणि बाचाबाचीदेखील होत आहे. राड्यादरम्यान हे दोन सदस्य टास्क कसा पूर्ण करणार हे पाहणं मनोरंजक ठरणार आहे. पहिल्या आठवड्यात ‘बिग बॉस मराठी’च्या नव्या पर्वामध्ये कोणते सदस्य सुरक्षित होणार आणि कोणते सदस्य नॉमिनेट होणार याची चाहत्यांना उत्सुकता लागून राहिली आहे. एक घर, 100 दिवस आणि 16 सदस्यांचा प्रवास आता सुरू झाला आहे. त्यामुळे प्रेक्षकांना मनोरंजनाची चांगलीच मेजवानी पाहायला मिळणार आहे.
या नव्या सिझनमध्ये स्पर्धक म्हणून वर्षा उसगांवकर, कोकण हार्टेड गर्ल म्हणजे अंकिता वालावलकर, योगिता चव्हाण, निखिल दामले, पंढरीनाथ कांबळे, जान्हवी किल्लेकर, अभिजीत सावंत, निकी तांबोळी, अरबाज पटेल, वैभव चव्हाण, घन:श्याम दरवडे, इरिना रूडाकोवा,आर्या जाधव, धनंजय पोवार, पुरुषोत्तमदादा पाटील, सूरज चव्हाण या स्पर्धकांनी भाग घेतला आहे.