18.9 C
New York

Arun Gawli : अरुण गवळी यांना दिलासा नाहीच, पुन्हा पॅरोल देण्यास कोर्टाचा नकार

Published:

नवी दिल्ली

मुंबईत एका खून खटल्याच्या प्रकरणात कुख्यात डॉन अरुण गवळीला 2018 मध्ये अटक केली गेली होती. 2000 मध्ये त्याला कनिष्ठ न्यायालयानं दोषी ठरवलं होतं. अरुण गवळी (Arun Gawli) यांच्या जामीन प्रकरणी सुप्रीम कोर्टात (Supreme Court) सुनावणी झाली. अरुण गवळी यांना दिलासा नाहीच. पुन्हा एकदा पॅरोल (Parole) देण्यास सुप्रीम कोर्टाने मनाई केली. याप्रकरणी नोव्हेंबर महिन्यात पुन्हा सुनावणी होणार आहे. अरुण गवळी यांना लवकरच पुन्हा जेलमध्ये परतावं लागणार आहे. अरुण गवळी सध्या नागपूर मध्यवर्ती कारागृहात जन्मठेपेची शिक्षा भोगत आहे.

काय आहे कमलाकर जामसांडेकर हत्या प्रकरण?

शिवसेना नगरसेवक कमलाकर जामसंडेकर यांचा सदाशिव सुर्वे नावाच्या व्यक्तीशी संपत्तीवरुन वाद होता. त्यानंतर सदाशिव सुर्वेने अरुण गवळीच्या गँगमधील दोघांना जामसांडेकर यांची हत्या करण्याची सुपारी दिल्याचा आरोप आहे. दोघांनी सदाशिवची अरुण गवळीशी भेट घालून दिली. गवळीने हत्या करण्यासाठी 30 लाखांची रक्कम मागितली.

सदाशिवने 30 लाखांची रक्कम देण्याची तयारी दर्शवली. अरुण गवळीने आपल्यावर संशय येऊ नये म्हणून प्रताप गोडसेला जामसंडेकरांच्या हत्येसाठी नवे शूटर शोधण्यास सांगितलं. गोडसेने नवे शूटर शोधण्याचे काम श्रीकृष्ण गुरव या साथीदाराकडे दिलं. श्रीकृष्णने नरेंद्र गिरी आणि विजयकुमार गिरी यांची निवड केली. तसेच त्यांना प्रत्येकी अडीच लाख रुपये देण्याचे कबूल केले. यापैकी प्रत्येकी 20 हजार रुपयांचा अॅडव्हान्सही देण्यात आला होता.

गुन्हे शाखेने दिलेल्या माहितीनुसार, विजयकुमार गिरीने अशोक कुमार जयस्वार या सहकाऱ्यासह जवळजवळ 15 दिवस कमलाकर जामसंडेकरांवर लक्ष ठेवलं. त्यानंतर 2 मार्च 2007 रोजी जामसंडेकर यांच्या राहत्या घरी हत्या करण्यात आली. गवळीला या घटनेनंतर एका वर्षाने पकडण्यात आलं. तत्कालीन गुन्हे शाखेचे प्रमुख राकेश मारिया, अतिरिक्त पोलीस आयुक्त देवेन भारती, पोलीस निरिक्षक दिनेश कदम, धनंजय दौंड, नीनाध सावंत, योगेश चव्हाण यांच्या पथकाने अरुण गवळीला अटक केली होती.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img