अमरावती
उरणमधील यशश्री शिंदे हत्याप्रकरण ताजे असताना, आता अमरावती (Amravati Crime) शहरातून एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. एकतर्फी प्रेमातून (One Side Love) एका तरुणाने अल्पवयीन मुलीवर चाकूने जीवघेणा हल्ला केला. अमरावती शहरतील राजपेठ अंडरपास मधील बुधवारी सकाळी 8.30 वाजताची ही घटना असून या घटनेमुळे अमरावती शहर हाटरले आहे.
अमरावती शहरातील राजापेठ अंडरपासवरून एक अल्पवयीन मुलगी कॉलेजला पायी जात होती. ती जात असताना मुलीच्या परिसरात राहणाऱ्या एका तरुणाने तिच्या गळ्यावर चाकूने हल्ला केला आहे. यात ही मुलगी गंभीर जखमी झाली आहे. जखमी अल्पवयीन मुलीवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. एकतर्फी प्रेमातून तरुणाने कॉलेजला निघालेल्या तरुणीचा पाठलाग करत तिच्यावर जीवघेणा हल्ला केला. या तरुणीवर उपचार सुरु असून तरुणीच्या गळ्याला 6 टाके पडले आहेत. तर या प्रकरणातील संशयित आरोपी प्रफुल काळकर याला पोलीसांनी केली अटक केली असून पुढील कायदेशीर कारवाई सध्या केली जात आहे. मात्र या घटनेनं संपूर्ण परिसरसह अमरावती हादरला असल्याचे चित्र आहे.
हाती आलेल्या माहितीनुसार, अमरावती शहरातील राजपेठ अंडरपास मार्गे एक अल्पवयीन मुलगी कॉलेजला पैदल जात होती. दरम्यान, या मुलीच्या परिसरातच राहणाऱ्या एका युवकाने तिची वाट अडवली आणि वाद घालण्यास सुरुवात केली. त्यानंतर त्याने सोबत आणलेल्या धारधार शस्त्राने तरुणीच्या गळ्यावर चाकूने वार करून तिला जखमी केलं. मुख्य रस्त्यावर दिवसाढवळ्या ही घटना घडल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. या नंतर परिसरात उपस्थित असलेल्या नागरिकांनी जखमी युवतीकडे धाव घेतली. दारम्यन मारेकरी पळ काढण्याच्या तयारीत असताना त्याचा पाठलाग करून जवळील ऑटो चालकांनी त्याला पकडून जबर मरण करत चांगलीच धुलाई केली. यानंतर या संपूर्ण घटनेची माहती राजपेठ पोलिसांना देण्यात आली असून पोलिसांनी या मारेकऱ्याला अटक केली असून पुढील कायदेशीर कारवाई पोलीस करत आहेत. धक्कादायक बाब म्हणजे, याआधी देखील याच मुलाने अल्पवयीन मुलीला अडीच महिन्यांपूर्वी छेडले होते. त्यावेळी राजापेठ पोलीस ठाण्यात या प्रकरणातील संशयित आरोपी प्रफुल काळकर विरोधात पोस्को अंतर्गत गुन्हा ही दाखल झाला होता. त्यानंतर पुन्हा ही घटना घडली असून एकतर्फी प्रेमातून हा हल्ला झाल्याचा संशय सध्या व्यक्त केला जात आहे.
न्यायाधीशाविरोधात तक्रार करणार – बच्चू कडू
अमरावती येथील अल्पवयीन मुलीवर एकतर्फी प्रेमातून चाकु हल्ला प्रकरणात पीडितेवर रुग्णालयात उपचार सुरु आहे. दरम्यान यापूर्वी याच प्रकरणात आरोपीवर पोस्को दाखल होता पण त्याला न्यायालयाने त्याला जामीन दिला त्यामुळे न्यायाधीशांविरोधात तक्रार करू असे बच्चू कडू यांनी सांगितले.