निर्भयसिंह राणे
भारताने (India vs SL) रविवारी, 28 जुलै रोजी पल्लेकेले आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर तीन सामन्यांच्या मालिकेत दुसऱ्या T20 सामन्यात श्रीलंकेचा (DLS Method) सात गाडी राखून पराभव केला. या विजयासह, टीम इंडियाने T20I मालिकेतील 2-0 अशी अभेद्य आघाडी घेतली. नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करताना भारताने श्रीलंकेला 161-9 असे रोखले. आठ षटकांत 78 धावांच्या सुधारित टार्गेटचा पाठलाग करताना भारत 6.3 षटकांतच सामाना जिंकला.
लेग-स्पिनर रवी बिष्णोईने चार षटकांत 3-26 धावा दिल्या. वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंग आणि हार्दिक पंड्या व फिरकी गोलंदाज अक्षर पटेल यांनी प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या. श्रीलंकेसाठी कुसल परेराने सर्वाधिक 34 चेंडूत 53 धावा केल्या, तर सलामीवीर पथूम निसांकाने 24 चेंडूत 32 धावांचे योगदान दिले. आठ षटकांत 78 धावांच्या DLS टार्गेटच पाठलाग करताना भारताने संजू सॅम्सनला गोल्डन डकवर आऊट करण्यात आले. मात्र, यशस्वी जैस्वाल (15 चेंडूत 30), कर्णधार सूर्यकुमार यादव (12 चेंडूत 26) आणि हार्दिक पंड्या (9 चेंडूत 22*) यांनी एकत्रितपणे मेन इन ब्लुचा विजय निशचित केला.
T20I मालिका 2-0 ने जिंकल्यानंतर, भारताची तिसरी T20I मंगळवार, 30 जुलै रोजी होणार आहे. हा सामना पल्लेकेले आंतराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळाला जाईल आणि IST संध्याकाळी 7 वाजता सुरु होईल. सामना तसाही डेड रबर असला तरी, मेन इन ब्लु क्लीन स्वीप करण्याचा प्रयत्न कारले. भारताला पहिली दोन सामन्यात संधी न मिळालेल्या काही खेळाडूंना अजमावण्याचा संधी आहे. ऑफस्पिनर वॉशिंग्टन सुंदर, वेगवान गोलंदाज खालील अहमद आणि अष्टपैलू फलंदाज शिवम दुबे यांना अद्याप खेळायला मिळाले नाही.
यजमान श्रीलंका व्हाईटवॉश टाळण्यासाठी तय्यार असतील. त्यांनी पहिल्या दोन T20I मध्ये काही आश्वासक इंनिंग्सचा सुद्धा समावेश आहे ज्यात पथूम निसांका, कुसल मेंडिस, कुसल परेरा यांनी आश्वासक धावा केल्या होत्या. दोन्ही सामन्यांमध्ये श्रीलंका संघाची फलंदाजी कोलमडल्यामुळे मधली आणि खालच्या फळीवर सर्व दबाव असल्याचे दिसत आहे.