22.3 C
New York

Uran Murder Case : यशश्री च्या मारेकऱ्याला फाशीची शिक्षा द्या – विश्व हिंदू परिषद

Published:

रमेश औताडे, मुंबई

नवी मुंबई जवळील उरण (Uran Murder Case) येथे राहणाऱ्या यशश्री शिंदे (Yashashree Shinde) हिची दाऊद शेख या तरुणाने अत्यंत क्रूरपणे हत्या केली. या क्रूर दाऊद शेखला लवकरात लवकर फाशीची शिक्षा देवून मृत यशश्रीला न्याय मिळावा अशी मागणी मंगळवारी मुंबई मराठी पत्रकार संघ येथे आयोजित पत्रकार परिषदेत विश्व हिंदू परिषदेचे (Vishwa Hindu Parishad) कोकण प्रांत अध्यक्ष मोहन सालेकर (Mohan Salekar) यांनी केली.

अनेक वर्षे सुरू असलेल्या भारतातील लव्ह जिहाद सारख्या षडयंत्राच्या माध्यमातून अनेक तरुणींच्या अस्तित्वाला धोका निर्माण झाला आहे. भारत देशात लव्ह जिहादच्या घटना मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. १८ वर्षाखालील व १८ वर्षा वरील मुलींना लक्ष्य करून त्यांना पळवून मुस्लिम करण्याचे षडयंत्र दिवसेंदिवस समोर येत आहे. दाऊद शेख यानेही अशाच विकृत मानसिकतेतून अत्यंत क्रूरपणे यशश्री शिंदे हिचा बळी घेतला आहे.

२०१९ साली यशश्री १५ वर्षांची असताना तिला त्रास दिल्याबद्दल शेख याच्यावर उरण पोलीस स्थानकात भारतीय न्याय संहितेच्या कलम ३५४, ५०७ अंतर्गत गुन्हा दाखल झाला होता. त्याकरिता त्याला तीन महिने तुरुंगवासही झाला होता. त्यानंतर काही वर्षे तो कर्नाटकात राहात होता. काही दिवसांपूर्वी तो उरण येथे परत आला होता व आपल्या मागील अपमानाचा बदला घेण्यासाठी त्याने यशश्री शिंदेची अत्यंत क्रूरपणे हत्या केली. त्याने यशश्रीच्या शरिराचे तुकडे केले, केस कापले, क्रूरपणे तिचे स्तन कापले तसेच गुप्तांगावरही वार केले होते.अशी माहिती विश्व हिंदू परिषदेच्या मातृशक्ती प्रांत सहसंयोजिका मनीषा भोईर यांनी यावेळी दिली.

गेल्या काही वर्षांत लव्ह जिहाद अंतर्गत हिंदू मुलींना फसवून, धाकदपटशाहिने, लैंगिक शोषण करून आणि प्रसंगी तिच्या प्राणास धोका उत्पन्न करून धर्मांतरण करण्यास भाग पाडण्याची प्रकरणे वाढली आहेत. चेंबूरची रुपाली चंदनशिवे, वसईची श्रद्धा वालकर, मानखुर्दची पूजा क्षीरसागर यांच्याप्रमाणे भीमकन्या यशश्री शिंदे ही देखील अशाच जिहादी मानसिकतेची बळी ठरली आहे. तिला लवकरात लवकर न्याय मिळावा याची मागणी विश्व हिंदू परिषद करीत आहे.

तसेच या प्रकरणात दाऊद शेख याला मदत करणाऱ्या प्रत्येकाला शिक्षा झाली पाहिजे अशीही मागणी केली आहे. तसे न झाल्यास हिंदू समाज तसेच संघटनांना आंदोलनाचे अस्त्र हाती घ्यावे लागेल असेही या पत्रकार परिषदेत स्पष्ट करण्यात आले. विश्व हिंदू परिषदेच्या मातृशक्ती विभागाच्या योगिता साळवी, योगिता थरवळ आदी महिला पदाधिकारी उपस्थित होत्या.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img