23.1 C
New York

Udhav Thackeray : अजितदादांचं वेशांतर; गृहमंत्र्यांनी राजीनामाच द्यावा, ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल 

Published:

मुंबई

पक्षाच्या राजकीय हितासाठी गृहमंत्री (Amit Shah) त्याचे अधिकार वापरतोयं, अशा गृहमंत्र्यामुळे राष्ट्रीय सुरक्षा धोक्यात येऊ शकते त्यामुळे गृहमंत्र्याने राजीनामा द्यावा, अशी मागणी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Udhav Thackeray) यांनी केलीयं. दरम्यान, माध्यमांशी गप्पा मारत असताना उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी सत्तेत सामिल होण्याबाबतच्या नाट्यमय घडामोडींबाबत भाष्य केलं. यावेळी बोलताना अजितदादांनी वेशांतर करुन केंद्रीय गृहमंत्री अजित पवार यांची भेट घेतल्याचं सांगितलं. त्यावरुन आता विरोधकांकडून टीकेची तोफ डागण्यात येत आहे.

उद्धव ठाकरे म्हणाले, देशात राष्ट्रीय सुरक्षेचं प्रकरण गंभीर असून अजित पवारांकडून गंमती जमतीतून बाहेर निघालेली गोष्ट ही भयानक असून आपल्या एअरपोर्टची सुरक्षा किती बोगस आहे हे यावरुन सिद्ध होत आहे. सत्ताधारी सर्वसामान्य माणसांना छळतंय पण दुसरीकडे राज्याचा तत्कालीन विरोधी पक्षनेता वेशांतर करुन एअरपोर्टवरील यंत्रणांना चकवा देऊन गृहमंत्र्यांची भेट घेत आहे, हे गृहमंत्र्यांना मान्य आहे का? असा थेट सवाल उद्धव ठाकरे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाहा यांना केलायं.

उद्धव ठाकरे म्हणाले, ज्यांच्याकडे देशाच्या सुरक्षेचा विभाग त्या देशाच्या गृहमंत्र्यांना देशाचा शासकीय यंत्रणेतला महत्त्वाचा माणूस वेशांतर करुन वेगळ्या नावाने आपल्याला भेटायला येतोय, सुरक्षा यंत्रणेला चकवा देवून येतोय, असा गृहमंत्री हा जागेवर राहताच कामा नये. जो सरकार पाडण्यासाठी, पक्ष फोडण्यासाठी सुरक्षा व्यवस्थेशी खेळ करतोय, असा गृहमंत्री जागेवर राहता कामा नये. अशा गृहमंत्र्याने राजीनामा दिला पाहिजे. जो गृहमंत्री स्वत:चे आपले सर्व अधिकार स्वत:च्या पक्षाच्या हितासाठी वापरतोय हा गृहमंत्री देशाचा गृहमंत्री म्हणून राहायला लायक नाही अशी घणाघाती टीका उद्धव ठाकरे यांनी केली.

उद्धव ठाकरे म्हणाले, काँग्रेस नेते राहुल गांधी काल संसदेत भाषण देत असताना देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारमन ज्याप्रकारे हसत होत्या. त्यांच्या कुणी मंत्री म्हणण्याच्या लायक आहे का? डबल इंजिन, ट्रिपल इंजिन सरकार केलं जात आहे पण इंजिन रुळावरुन खाली जात आहेत. त्यामुळे संबंधित मंत्र्यांनी राजीनामे द्यायला पाहिजेत अशी मागणी उद्धव ठाकरे यांनी केली.

उद्धव ठाकरे म्हणाले, मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहीजे ही शिवसेनेची स्पष्ट भूमिका आहे. आरक्षणाची मर्यादा वाढवणे हे कोणत्याही राज्य सरकारच्या हातात नाही हेही सत्य आहे. आरक्षणाची मर्यादा वाढवायची असेल तर तसा निर्णय केंद्र सरकारने घेणे गरजेचे आहे. त्यामुळे सर्वांनी मिळून या प्रश्नी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भेटले पाहीजे. आरक्षणाबाबत मोदींनी निर्णय घ्यावा. ते जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असेल. मराठा, ओबीसी, धनगर, आदिवासी यांना दुखवायचं की नाही हे मोदींनी सांगावे. आरक्षणाची मर्यादा वाढवणारे विधेयक त्यांनी संसदेत आणावे. शिवसेनेचे खासदार त्याला पाठींबा देतील असे ठाकरे यांनी सांगितले. त्यासाठी इथे भांडत राहण्या पेक्षा सर्वांनी मिळून दिल्लीला जावू , तिथे मोदींना भेटू असेही ठाकरे यावेळी म्हणाले. 

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img