22.3 C
New York

Sharmila Thackeray : उरण हत्या प्रकरणानंतर शर्मिला ठाकरेंचा संताप

Published:

नवी मुंबई

उरणमध्ये यशश्री शिंदे (Yashashree Shinde) हिची हत्या (Uran Murder Case) करण्यात आली. त्याआधी नवी मुंबईत शिळफाटा येथे विवाहीतेवर अत्याचार करून तिचीही हत्या करण्यात आली. या पार्श्वभूमीवर मनसे नेत्या आणि राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे (Sharmila Thackeray) यांनी संताप व्यक्त केला आहे. शिवाय त्यांनी नवी मुंबई पोलिस आयुक्तांची (Navi Mumbai Police Commissioner) भेट घेत, जरा पोलिसांची दहशत दिसू द्या, असेही सुनावले आहे. उरण हत्येत लव्ह जिहादचा मुद्दा उपस्थित केला जात आहे. यावरही शर्मिला ठाकरे यांनी परखड मत व्यक्त केले आहे. शिवाय शिळफाटा इथं झालेल्या प्रकरणावरही त्यांनी आपला राग आणि संताप व्यक्त केला आहे.

काही दिवसांपूर्वी शिळफाटा येथे नवी मुंबईच्या लेकीवर अत्याचार करुन तिची हत्या करण्यात आली. नंतर उरणमध्ये एका मुलीची दुर्दैवी हत्या झाली. राज्यात अशा घटना वारंवार घडत आहे. राज्यातल्या महिला,लेकी सुरक्षित नाहीत. अशा वेळी पोलिसांनी त्यांची दहशत दाखवणे गरजेचे आहे. त्या शिवाय या नराधमांना चाप बसणार नाही. या आरोपी नराधमांना कठोरातली कठोर शिक्षा देऊन या लेकींना न्याय द्यावा, या मागणीसाठी शर्मिला ठाकरे या नवी मुंबई पोलिस आयुक्त कार्यालयावर धडकल्या होत्या. या प्रकरणात कोणीही राजकीय हस्तक्षेप करणार नाही. पोलिसांनी आपली ताकद आणि दहशत दाखवली पाहीजे. ही दहशत तुम्ही जोपर्यंत दाखवत नाही तोपर्यंत हे नराधम थांबणार नाही असेही ठाकरे यावेळी म्हणाल्या. त्यांनी नवी मुंबई पोलिस आयुक्त मिलिंद भारांबे यांची भेट घेवून आपला संताप व्यक्त केला.

अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी या नराधमांना वेळीच चाप लावला तर इतर नराधम असे कृत्य करण्यास धजावणार नाहीत, अशी मागणी देखील शर्मिला ठाकरे यांनी यावेळी केली. यावेळी मनसे सरचिटणीस शालिनी ताई ठाकरे, रिटा ताई गुप्ता, सरचिटणीस स्नेहल सुधीर जाधव या देखील उपस्थित होत्या.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img