13.1 C
New York

Dharavi : धारावीमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्त्याची हत्या; अंत्ययात्रेवरही दगडफेक

Published:

मुंबई

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSS) कार्यकर्ता अरविंद वैश्य (Arvind Vaishya) यांच्या अंत्ययात्रेवर अचानक दगडफेक झाल्याने धारावीत (Dharavi) तणाव निर्माण झालाय. दगडफेक थांबवण्यासाठी पोलिसांनी (Police) लाठीचार्ज केला. त्यामुळे अंत्ययात्रेत सहभागी झालेले 4 जण जखमी झालेत. धारावीत परिस्थिती नियंत्रणाबाहेर जात असल्याचे पाहून पोलिसांनी अतिरिक्त पोलीस बंदोबस्त मागवला आहे. सध्या परिस्थिती नियंत्रणात आहे. धारावीत तणावपूर्ण शांतता आहे.

राष्ट्रीय स्वयंसेवक अरविंद वैश्य हे धारावीच्या राजीव गांधी नगरमध्ये राहत होते. ते एका मेडिकल स्टोअरमध्ये काम करून आपला उदरनिर्वाह करत होते. रविवारी त्यांच्या मित्राचा एका व्यक्तीशी वाद झाला. त्यामुळे ते दोघे धारावी पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यासाठी गेला. पोलीस ठाण्यातून परतत असताना आरोपींनी अरविंद वैश्य यांच्यावर चाकूने हल्ला केला, त्यानंतर अरविंदला सायन रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण त्याआधीच त्यांचा मृत्यू झाला होता. या घटनेनंतर भाजप कार्यकर्त्यांनी निदर्शने केली असता पोलिसांनी गुन्हा दाखल करून दोन आरोपींना अटक केली.

काय आहे प्रकरण?

धारावीच्या राजीव नगर भागात रविवारी रात्री अरविंद वैश्यची हत्या करण्यात आली. दोन गटांमध्ये सुरू असलेलं भांडण सोडवायला गेलेल्या अरविंद वैश्य याची हत्या केली गेली. अरविंद वैश्यचा भाऊ शैलेंद्र वैश्यच्या तक्रारीनुसार रविवारी संध्याकाळी 7 वाजण्याच्या सुमारास अल्लू, आरिफ, शुभम आणि शेर अली यांचं सिद्धेशसोबत भांडण सुरू होतं. हे भांडण सुरू असताना अल्लू आणि त्याच्या सहकाऱ्यांनी सिद्धेश आणि त्याच्या वडिलांना मारायला सुरूवात केली. हे भांडण सोडवायला अरविंद तिकडे गेला, तेव्हा अल्लू आणि त्याच्या सहकाऱ्यांनी अरविंदला मारहाण केली. या मारहाणीची तक्रार द्यायला अरविंद एका मित्राच्या बाईकवर धारावी पोलीस स्टेशनमध्ये गेला. यावेळी मागून सद्दाम आणि जुम्मनही गेले, ज्यांनी अरविंदला पोलिसांसमोरच केस मागे घ्यायची धमकी दिली. केस मागे घेतली नाही तर परिणाम भोगायला तयार राहा, अशी धमकी अरविंदला दिली गेल्याचं त्याच्या भावाने सांगितलं आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img