मुंबई
योग गुरु रामदेव बाबा (Ramdev Baba) यांच्या पतंजली कंपनीला मुंबई हायकोर्टाने (Mumbai High Court) तब्बल साडेचार कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे. हायकोर्टाच्या एका आदेशाच्या उल्लंघन केल्याप्रकरणी ही कारवाई केली आहे. पतंजलीला (Patanjali) सोमवारी दोन मोठे धक्के बसले आहेत. मुंबईबरोबर दिल्ली हायकोर्टाने ही पतंजलीला काही औषधे मागे घेण्याचे आदेश दिले आहेत. मंगलम ऑरगॅनिक्सच्या याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती आर.आय. छागला यांनी हा आदेश दिला.
मुंबई हायकोर्टाने अंतरिम आदेशात पतंजली आयुर्वेदाला कापूर उत्पादने न विकण्यास सांगितले होते. मंगलम ऑरगॅनिक्ससोबत सुरू असलेल्या ट्रेडमार्कच्या उल्लंघनाशी संबंधित सुनावणी सुरू आहे. एका प्रतिज्ञापत्रात पतंजलीने न्यायालयाची बिनशर्त माफी मागितली आणि भविष्यात न्यायालयाच्या आदेशाचे पालन करण्याचे आश्वासन दिले होते.