21 C
New York

Pankaja Munde : पंकजा मुंडे – प्रकाश आंबडेकर यांची भेट; राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण

Published:

लातूर

राज्यातील सर्व राजकीय पक्ष सध्या आगामी विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. यादरम्यान हलचालींन वेग आलेला असतचानाच भारतीय जनता पक्षाच्या (BJP) नवनिर्वाचित विधान परिषदेच्या आमदार पंकजा मुंडे (Pankaja Munde) आणि वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांची भेट झाली. लातूरहून बीडकडे येताना या दोन्ही नेत्यांची भेट झाली. प्रकाश आंबेडकर हे सध्या आरक्षण बचाव यात्रेवर निघाले आहेत. आज यात्रा लातूरहून बीडमध्ये दाखल होणार आहे. या प्रवासात पंकजा मुंडे आणि प्रकाश आंबेडकर यांची भेट झाली. पंकजा मुंडे यांनी प्रकाश आंबेडकर यांचे स्वागत केले. आरक्षण बचाव यात्रे दरम्यान मुंडे आणि आंबेडकरांची भेट हा राज्यात चर्चेचा विषय झाला आहे.

राज्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून मराठा आणि ओबीसी समाज आरक्षणावरुन आक्रमक झालेला आहे. सुरुवातीला प्रकाश आंबेडकरांचा मनोज जरांगे यांच्या मराठा आरक्षण आंदोलनाला पाठिंबा राहिला. मात्र लोकसभा निवडणुकीनंतर आंबेडकरांनी त्यांचा स्टँड बदलला. जरांगेंच्या सगेसोयरे आरक्षणाला प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीने स्पष्टपणे नकार दिला. त्यासोबतच मराठ्यांचे आरक्षणाचे ताट वेगळे पाहिजे. त्यांना ओबीसीतून आरक्षण देण्यासही प्रकाश आंबेडकरांनी नकार दिला. पंकजा मुंडेंचा बीड लोकसभेत झालेला पराभव हा जरांगेंच्या आंदोलनाचाच परिणाम असल्याचे बोलले जाते. या सर्व पार्श्वभूमीवर पंकजा मुंडे आणि प्रकाश आंबेडकर यांची भेट चर्चाचा विषय झाला आहे.

प्रकाश आंबेडकर हे काल रात्री लातूरमध्ये होते. आज ते लातूरहून बीडच्या दिशेने निघाले होते. पंकजा मुंडे या बीडमधून लातूरकडे निघाल्या होत्या. दरम्यान या दोन्ही नेत्यांची भेट झाली. दोघांनी एकमेकांना पुष्पगुच्छ देऊन एकमेकांचे स्वागत केले. ही भेट पूर्वनियोजित नव्हती असे दोन्ही बाजूंनी सांगितले जात आहे. मात्र विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निघालेली प्रकाश आंबेडकरांची आरक्षण बचाव यात्रा. त्यांनी शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांनी मराठा आरक्षणावर भूमिका स्पष्ट करा, म्हणण्याची भाजप आणि शिंदे गटाप्रमाणे केलेली मागणी. आणि या दरम्यानच झालेली पंकजा आणि प्रकाश आंबेडकरांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img