अकोला
विधान परिषदेचे राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांची गाडी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी (MNS Activist) फोडली आहे. मनसे कार्यकर्ते आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आमने-सामने आल्याने काही वेळासाठी वातावरण तापलं होतं. राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्यावर सुपारी बाज म्हणत टीका केल्याने ही गाडी फोडली गेल्याचं सांगण्यात येत आहे.
दरम्यान या घटनेनंतर हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. अमोल मिटकरी अकोल्यामध्ये असतानाही घटना घडली. ते विश्रामगृहामध्ये कार्यकर्त्यांचे भेटीगाठी घेत होते. त्याचवेळी बाहेर मनसे कार्यकर्त्यांनी त्यांच्या गाडीवर हल्ला केला. त्यामुळे या घटनेनंतर आता मनसे विरुद्ध अजित पवार गटाचा संघर्ष पेटला आहे.