3.6 C
New York

Maratha Reservation : आरक्षणाच्या संदर्भातली शिवसेनेची भूमिका दुर्दैवी – आंबेडकर

Published:

बीड

उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या शिवसेनेने जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांच्या मागणीच्या संदर्भात मराठा समाजाला (Maratha Reservation) ओबीसीमधून आरक्षण (OBC Reservation) द्यावं याबाबतीत मांडलेली भूमिका दुर्दैवी असल्याची टीका वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी केली आहे.

ॲड. आंबेडकर यांनी म्हटले आहे की, आरक्षण मागणीच्या बाजूने आहात की विरोधात आहात हे मांडण्याऐवजी त्यांनी असे म्हटले आहे की, मोदींकडे जा आणि आरक्षण वाढवून घ्या. ते आरक्षण वाढवले की, मराठा समाजाला न्याय मिळेल. आम्ही याचा अर्थ असा काढतो की, ओबीसींचा विरोध आहे मराठ्यांना ओबीसीमध्ये घेण्यासाठी आणि उध्दव ठाकरे सुचवतात की, मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देण्यात यावं. भांडणे मिटवण्याऐवजी भांडणे लावण्याचा हा प्रकार आहे. त्यामुळे महाराष्ट्रात शांतता भंग होण्याची शक्यता अधिक असल्याचेही आंबेडकर यांनी म्हटले आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img