4 C
New York

Leopard : फापाळेशिवार येथे विहीरीत पडून बिबट्याच्या बछड्याचा मृत्यू

Published:

रमेश तांबे, ओतूर

ओतूर जवळील फापाळेशिवार येथे एका विहीरीत पडून बिबट्याच्या (Leopard) बछड्याचा मृत्यू झाल्याची घटना सोमवारी दि.२९ रोजी घडली असल्याची माहिती ओतूरचे वनपरिक्षेत्र अधिकारी वैभव काकडे यांनी दिली.

या संदर्भात अधिक माहिती देताना ओतूरचे वनपरिक्षेत्र अधिकारी वैभव काकडे यांनी सांगितले की, फापाळेशिवार येथील गेनभाऊ कोंडीबा फापाळे व तानाजी फापाळे यांच्या शेतजमीनीतील  कळमजाई माता मंदिरा शेजारील भागात असलेल्या बिगर कठड्याच्या विहिरीमध्ये बिबट्याचा बछडा पडल्याची माहिती सोमवार दि.२९ रोजी दुपारी तीन वाजता वनविभागाला मिळाली.सदर माहिती मिळताच ओतूरचे वनपरिक्षेत्र अधिकारी वैभव काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल सुधाकर गीते,वनपाल रूपाली जगतात, वनरक्षक विश्वनाथ बेले, परसराम खोकले, वनसेवक किसन केदार, ,गंगाराम जाधव, गणपत केदर आदी कर्मचारी व आळे येथील रेस्कु टीमच्या सह ताबडतोब जागेवर जाऊन प्रत्यक्ष पाहाणी केली असता, सदर विहीर ही सुमारे ८० फुट खोल असुन,सदर विहीरीला कठडा नसल्यामुळे हा बछडा विहिरीत पडला असल्याची शक्यता आहे.

सदरील बिबट्याचा बछडा विहीरीतुन बाहेर काढण्यासाठी वनकर्मचारी यांनी अतोनात प्रयत्न केले. सदर बिबट्याच्या मृत बछड्याला विहिरीतून बाहेर काढण्यात मंगळवार दि.३० रोजी सायंकाळी वनविभागाला अखेर यश आले असून, सदर बिबट्या हा मादी असून त्याचे वय दोन ते तीन वर्षे असल्याचे वनविभागाच्या सूत्रांनी सांगितले.

सदर बछड्याला विहिरीतून बाहेर काढण्यासाठी अनुराग फापाळे, तेजस फापाळे, प्रदीप फापाळे, राजू भनगडे, भूपेश फापाळे,संजय फापाळे, हेमंत जाधव यांनी मोलाचे सहकार्य केले. पण विहीर खोल असल्याने बिबट बछडास वाचविण्यास वनविभागास अपयश आले सदर बिबट बछडा खोल विहिरीत बुडाला असल्याने तो खोल पाण्यात विहिरीतील मोटारीस अडकल्यामुळे मृत झाला आहे. या परिसरात ससे व अन्य इतर प्राणी असल्याने बिबट्या भक्षाच्या शोधात फिरत असताना तीच्या पाठीमागे बछडा आला असल्याची शक्यता वन विभागाने वर्तवलीआहे. 

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img