7.3 C
New York

Paris 2024 Olympics : पृथिका पावडेला हरवून भारताची मनिका बत्रा टेबल टेनिस मध्ये 16व्या फेरीसाठी पात्र

Published:

निर्भयसिंह राणे

भारताची टेबल टेनिस माएस्ट्रो मनिका बत्राने (Manika Batra) सध्या सुरु असलेल्या पॅरिस ऑलिम्पिकमधील (Paris Olympics) टेबल टेनिस महिला एकेरीच्या 32च्या सामन्यात फ्रान्सच्या पृथिका पावडेला (Pruthika Pavade) पराभूत केले. मनिका बत्राने टेबल टेनिस महिला एकेरी फेरीतील 32च्या सामन्यात तिच्या फ्रेंच प्रतिस्पर्धीचा 4-0 (11-9, 11-6, 11-9, 11-7) असा पराभव केला.

बात्राने दोन गुणांच्या पिछाडीवरून परतत असताना पहिला गेम 11-9 असा जिंकला. मनिकाने दुसरा गेम आरामात पाच गुणांच्या फरकाने जिंकला. पावडेने तिसऱ्या गेममध्ये प्रतिकार करण्याचा खूप प्रयत्न केला तरी बात्रा यांनी गेम 11-9 असा आपल्या नावे केला. याआधी राऊंड ऑफ 64च्या सामन्यात मनिका बत्राने ग्रेट ब्रिटनच्या ॲना हर्सीवर (Anna Hursey) विजय मिळवला. 29 वर्षीय बात्राने दमदार कामगिरी दर्शवत 11-8, 12-10, 11-9, 9-11, 11-5 अशा गुणांसह सामना जिंकून 32व्या फेरीत आपले स्थान निश्चित केले.

Ravichandran Ashwin : दुसऱ्यासाठी खोदलेल्या खड्ड्यात अश्विन स्वतःच पडले, नेमकं प्रकरण काय

बात्राने संपूर्ण सामन्यात दबावाखाली उल्लेखनीय संयम दाखवला. तिसरा गेम विशेषतः तीव्र होता, ॲना हर्सीने एका टप्प्यावर 8-7 अशी आघाडी घेतली. मात्र, बात्राने शांत राहून दुसऱ्या गेम पॉईंटमध्ये 11-9 अशी बरोबरी साधली. चौथ्या गेममध्ये बात्राने दमदार सुरुवात करत झटपट 5-1 अशी आघाडी घेतली. तरीही, हर्सीने कमबॅक करत अखेरीस 6-5 अशी आघाडी घेतली. आघाडीची वारंवार देवाणघेवाणसह खेळ सुरूच राहिला आणि हर्सीने सामन्यात महत्वपूर्ण पुनरागमन करत गेम 11-9 असा जिंकण्याचा मार्ग शोधला.

पराभवानंतरही मनिकाने चौथा गेम गमावल्याची निराशा बाजूला ठेवली आणि पाचव्या गेममध्ये निर्धाराने कमबॅक केले. तिने 11-5 असा विजय मिळवून स्टाईलमध्ये गेम जवळ आणला, ज्यामुळे तिने सामन्यातील विजय निश्चित केला. या विजयामुळे बात्रा 32च्या फेरीत पोहोचली, जिथे तिने आपला परफॉर्मन्स कायम ठेवून आणि जिंकून 16च्या फेरीत प्रवेश मिळवला.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img