23.1 C
New York

Bigg Boss Marathi 5: कोकण हार्टेड गर्लच्या ‘त्या’ प्रतिक्रियेवर निक्कीची सटकली

Published:

Bigg Boss Marathi 5: 28 जुलै पासून बिग बॉस मराठीचा (Bigg Boss Marathi 5) नवा पर्व दणक्यात सुरु झाला. पण घरात मात्र पहिल्याच दिवसापासून वादाची ठिणगी पडत असल्याचं पाहायला मिळालं. निक्कीचा (Nikki Tamboli) वाद आधी वर्षा उसगांवकरांसोबत (Varsha Usgaonkar) आणि आता अंकितासोबत (Ankita Prabhu Walavalkar) म्हणजेच ‘कोकण हार्टेड गर्ल’ सोबत वाद होता होता राहिला. त्याबद्दल निक्की जान्हवी किल्लेकर हिच्यावजळ बोलत होती. बिग बॉस मराठीच्या घरात स्पर्धकांना पहिल्याच दिवशी खाण्यापिण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागला. अशातच अनेकांना एकमेकांचं वागणं खूप खटकलं असून आता त्यावर घरात राडा होणार का हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.

Bigg Boss Marathi 5: अंकिता आणि योगिता किचनमध्ये भांडी घासत असताना निक्की तांबोळी ही जान्हवीला हे सर्व सांगत असते. त्यावेळी निक्कीचा रोख हा अंकितावर होता. त्यामुळे आता अंकिता आणि निक्कीमध्ये लवकरच मोठा राडा होणार असल्याचं पाहायला मिळणार. मात्र अंकिताला ही गोष्ट कळल्यावर अंकिता काय करणार हे सुद्धा पाहणं उत्सुकतेचं असणार आहे.

बिग बॉसच्या घरात वाहू लागले प्रेमाचे वारे!

नेमकं काय घडलं?
निक्की जान्हवीला सांगत होती की, निखिलने मला सांगितलं की, जर तिला तिचा सावरडो ब्रेड आला आहे तर तुझंही किनोव्हा येईल. त्यानंतर निक्कीने बाहेर भांडी घासत असलेल्या अंकिताकडे बोट केलं आणि म्हणाली की तिने वाकडं तोंड केलं. आणि हे मी त्या आरशात पाहिलं. माझी तेव्हा खूप सटकली होती. कारण मला भूक खूप लागली होती, त्यामुळे मी आधीच वैतागलेली सुद्धा होती. कारण तिकडे आधीच काहीतरी सुरु होतं आणि मला ते वातावरण खराब करायचं नव्हतं. पण वेळ आल्यावर मी नक्कीच बोलेन. छोट्या छोट्या गोष्टीवरुन मला वाद करायचा नाही. कारण मी जर वाद केला तर वाद हा वाद नसतो तर तो बतंगडा असतो. त्यामुळे निक्की आणि अंकितामध्ये आता वादाची ठिणगी पेटणार का? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

बिग बॉसच्या घरात खाण्यापिण्यासाठी संघर्ष
Bigg Boss Marathi 5: पहिल्याच दिवशी बिग बॉसच्या घरात घरातलं पाणी गेलं. त्यानंतर त्यांच्यासाठी लॅविश ब्रेकफास्ट आयोजित करुनही स्पर्धकांना त्याचा आस्वाद त्यांना घेता नाही आला. त्यासाठी ज्यांच्याकडे निर्णयक्षमता नाही, अशा तीन स्पर्धकांना बाकीच्या सदस्यांना नॉमिनेट करण्यास सांगितलं. त्यानंतर घरातल्यांनी सूरज चव्हाण, इरीना आणि धनंजयला नॉमिनेट केलं. त्यामुळे आता हे तिघं मिळून घरातल्यांसाठी काही वस्तू आणतात. त्यावरुन घरात काय राडा होणार याची उत्सुकता सगळ्यांनाच लागली आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img