23.1 C
New York

Bigg Boss Marathi 5: बिग बॉसच्या घरात वाहू लागले प्रेमाचे वारे!

Published:

Bigg Boss Marathi 5: नुकतीच ‘बिग बॉस मराठी’च्या नवीन पर्वाची (Bigg Boss Marathi 5) सुरुवात झाली आहे. यंदाच्या पर्वामध्ये एकूण १६ स्पर्धकांनी घरात एन्ट्री घेतली असून या सगळ्यांमध्ये ट्रॉफीवर नाव कोरण्यासाठी तगडी स्पर्धा सुरू झालेली आहे. परंतु, ‘बिग बॉस मराठी’च्या घरात खेळ सुरु झाल्यावर पहिल्याच दिवशी प्रेमाचे वारे वाहायला सुरुवात झाली आहे.

Bigg Boss Marathi 5: ‘बिग बॉस मराठी’च्या ग्रँड प्रीमियर दिवशी रितेश देशमुख (Ritesh Deshmukh) समोर निक्की तांबोळीने (Nikki Tamboli) आपण अरबाज पटेलवर (Arbaz Patel) फिदा झाल्याचं सांगितलं होतं. आता घरात एन्ट्री केल्यावर दुसऱ्याच दिवशी छोटा पुढारी अर्थात घन:श्याम दरवडे अरबाज आणि निक्कीला एकमेकांच्या नावाने चिडवत निक्कीला वहिनी म्हणून हाक मारणार आहे.

 पहिल्याच दिवशी ‘त्या’ दोघींमध्ये वादाची ठिणगी!

Bigg Boss च्या निक्की अरबाजची जोडी जमणार का?
‘बिग बॉस मराठी’ दुसरा दिवस उजाडला आहे आणि दुसऱ्या दिवसाचा प्रोमो समोर आला असून घरातील सदस्य दुसऱ्याच दिवशी रोमँटिक अंदाजात दिसून येत आहेत. प्रोमोमध्ये पाहायला मिळतंय की, निक्की तांबोळी चहा बनवायला घेते. मात्र, चहाचा हीटर चालू होत नसल्याने ती घन:श्यामला ‘बिग बॉस’ला विनंती करायला सांगते. त्यावेळी छोटा पुढारी म्हणतो, “‘बिग बॉस’ आमच्या वहिनीचं तरी ऐका…” त्यावर अरबाज त्याला लाजून म्हणतो, “थांब रे सकाळी सकाळी असं काय बोलतो तू…”. पुढे छोटा पुढारी म्हणतो, “तुझं प्रेम उतू चाललंय ते सांगतोय बिग बॉसला…चहा उतू गेला, तर काही बिघडत नाही”. छोटा पुढारीच्या या वक्तव्यावर निक्की आणि अरबाजला हसू अनावर होतं. अरबाज तर सरळ डोक्यालाच हात लावतो. त्यानंतरही छोटा पुढारी पुढे म्हणतो, ‘बिग बॉस’ “प्रेमात असचं असतंय”. ‘बिग बॉस मराठी’च्या घरात घन:श्याममुळे हास्यकल्लोळ होतो.

कलर्स मराठी वाहिनीवर Bigg Boss मराठीचा हा नवीन प्रोमो शेअर करण्यात आला आहे. आता हा प्रोमो पाहून चाहत्यांच्या मनातसुद्धा किलबिलाट सुरु होणार का? असा प्रश्न उद्भवतोय. अरबाज निक्कीची बिग बॉसच्या घरात पहिली जोडी जमणार का? अशा चर्चांना उधाण आलं आहे.

Bigg Boss Marathi 5: दरम्यान, ‘Bigg Boss मराठी’च्या ग्रँड प्रीमियरला निक्की तांबोळी अरबाजकडे बघून लाजताना दिसली होती. अरबाजला पाहून सर्वच विसरली असल्याचं ती म्हणाली होती. निक्की रितेश देशमुखला सुद्धा “थोडं थोडं काहीतरी होऊ शकतं” असं म्हणाली होती. तर दुसरीकडे अरबाजही, निक्कीला “आता तुला सगळीकडे मीच दिसेन, माझ्याशिवाय तिला दुसरं काही सुचणार नाही, असं म्हणाला होता”. त्यामुळे आता ‘बिग बॉस मराठी’च्या या पर्वामध्ये निक्की आणि अरबाजची जोडी जमणार का? याकडे ‘बिग बॉस’प्रेमींचं लक्ष लागलं आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img