8 C
New York

Bigg Boss Marathi 5: निक्कीने ‘त्या’ अभिनेत्रीची काढली थेट अक्कल!

Published:

Bigg Boss Marathi 5: ‘बिग बॉस मराठी’च्या (Bigg Boss Marathi 5) नवीन पर्वामध्ये पहिल्या दिवसापासूनच स्पर्धकांमध्ये वाद घडल्याचं पाहायला मिळतंय. वर्षा उसगावकर (Varsha Usgoankar) आणि निक्की तांबोळी (Nikki Tamboli) यांच्यात हा वाद चांगलाच रंगलेला दिसतोय. ‘बिग बॉस’ने वर्षा उसगावकर यांच्या एका चुकीमुळे सदस्यांना जमिनीवर आणलं आहे. वर्षा उसगांवकर यांच्यामुळे सर्व सदस्यांना जमिनीवर झोपावं लागणार असल्याने निक्की तांबोळीचा राग अनावर झालेला आजच्या भागात पाहायला मिळणार आहे.

कोकण हार्टेड गर्लच्या ‘त्या’ प्रतिक्रियेवर निक्कीची सटकली

वर्षा उसगावकर झोपल्या पण शिक्षा सर्वांना
Bigg Boss Marathi 5: ‘बिग बॉस मराठी’च्या पहिल्या दिवशी घरात पाणी, काही टास्क किंवा काम नसल्यामुळे वर्षा उसगांवकर झोपल्या होत्या. त्यामुळे ‘बिग बॉस’ने त्यांच्यासकट घरातील इतर सदस्यांनाही शिक्षा दिली. ‘बिग बॉस मराठी’च्या नव्या प्रोमोमध्ये ‘बिग बॉस’ म्हणत आहेत,”आपल्याला आता बेडचा वापर करण्याची परवानगी नाही”. ‘बिग बॉस’च्या या आदेशानंतर घरातील सर्व सदस्य चिंतेत आले. त्यानंतर ‘बिग बॉस’ला वर्षा उसगांवकर म्हणाल्या, बिग बॉस “चुकून झालं”.

वर्षाताईंवर निक्कीचा चढला पारा
वर्षा उसगांवकर यांचा चुकून डोळा लागला त्यावर पारा चढलेली निक्की म्हणते, “आम्हाला भोगावं लागतंय आता..तुमच्यामुळे आता आम्हाला जमिनीवर झोपावं लागतंय”. यावर वर्षा म्हणतात,”माझ्या एकटीमुळे नाही”. त्यावर निक्की म्हणाली,”तुम्ही झोपला होतात तेव्हा तुमची अक्कल कुठे गेली होती”. निक्कीला शांत करत वर्षा ताई म्हणतात,”आरडाओरडा करू नको”. तरीही निक्की तांबोळी शांत बसत नाही त्यांना उलट प्रतिउत्तर देत त्यांनाच शांत बसण्यास सांगते. ‘बिग बॉस मराठी’च्या घरातील सर्व सदस्यांना आता बेडचा वापर करता येणार नाही. निक्की आणि वर्षाताईंचा चढलेला पारा ‘बिग बॉस’ प्रेमींना मनोरंजनाची मेजवानी देणारा ठरेल. आजचा एपिसोड कधी येणार याची वाट प्रेक्षक आतुरतेने पाहत आहेत.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img