26.6 C
New York

Amol Mitkari : मनसेच्या कार्यकर्त्यांना अटक करा, मिटकरींचं पोलीस स्टेशनमध्ये आंदोलन

Published:

अकोला

राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरींवर (Amol Mitkari) केलेला हल्ला आणि गाडीची तोडफोड केल्या प्रकरणी 8 मनसे (MNS) कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. अकोल्यातील सिव्हील लाईन पोलिसांनी हे गुन्हे दाखल केले आहेत. या प्रकरणातील संशयित आरोपींमध्ये मनसे सरचिटणीस कर्णबाळा दुनबळे, जिल्हाध्यक्ष पंकज साबळे, राजेश काळे, सौरभ भगत, महिला जिल्हाध्यक्ष प्रशंसा अंबेरे, बार्शीटाकळी तालुकाध्यक्ष सचिन गालट यांच्यासह इतर कार्यकर्त्यांचा समावेश.

या प्रकरणातील हल्लेखोरांना जोपर्यंत अटक होत नाही, तोपर्यंत अकोल्यातील सिव्हील लाईन पोलीस ठाण्यातच ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा आमदार अमोल मिटकरी यांनी दिला होता. त्यानंतर आता हा कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. मात्र या प्रकरणातील सर्व मनसे कार्यकर्ते फरार असून पोलीस सध्या त्यांचा शोध घेत आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रवक्ते अमोल मिटकरी यांच्या विरोधात मनसे आज चांगलीच आक्रमक झाल्याचं पाहायला मिळाले आहे. अमोल मिटकरी यांची गाडी मनसे कार्यकर्त्यांनी फोडल्याची घटना आज अकोल्यात घडलीय. दरम्यान, अमोल मिटकरींनी राज ठाकरे यांच्यावर टीका केल्यानं मनसैनिक आक्रमक झालेत. मनसेप्रमुख राज ठाकरे यांचा उल्लेख सुपारीबाज असा केल्याने अमोल मिटकरी यांच्या गाडीची तोडफोड करण्यात  आली आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img