23.1 C
New York

Amol Mitkari Car Attack : अमोल मिटकरींची गाडी फोडणाऱ्या मनसे कार्यकर्त्याचा मृत्यू!

Published:

अकोला

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांच्या कारवर आज 30 जुलै अकोल्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी (MNS Activist) जोरदार हल्ला चढवला. यावेळी बराच राडाही झाला. पण आता या घटनेतील सर्वात मोठी आणि धक्कादायक बातमी आता समोर आली आहे. मिटकरींच्या कारची तोडफोड (Amol Mitkari Car Attack) करणाऱ्यांमधील आरोपी आणि मनसैनिक जय मालोकार (Jay Malokar) याचा काही वेळापूर्वीच हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाला. या प्रकरणावरून आता राष्ट्रवादी आणि मनसे आमनेसामने आले आहेत. तर मिटकरी यांनी यासंदर्भात केलेल्या तक्रारीत राज ठाकरेंचंही (Raj Thackeray) नाव आलं आहे. 

राज ठाकरे यांच्यावर सुपारी बाज म्हणत टीका केल्याने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी विधान परिषदेचे राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी यांची गाडी फोडली होती. त्यानंतर आता मिटकरी यांनी यासंदर्भात तक्रार दाखल केली आहे. त्या एफआयआरमध्ये राज ठाकरे यांचं देखील नाव आलं आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अकोल्याच्या शासकीय विश्रामगृहावर जो राडा मनसैनिकांकडून करण्यात आला त्यामध्ये जय मालोकार हा देखील सहभागी होता. पण याच राड्यानंतर मालोकार याला अस्वस्थ वाटू लागलं. त्यामुळे त्याला अकोल्यातील एका खाजगी रुग्णालयात करण्यात आलं. राड्यात झालेल्या झटापटीनंतर जय मालोकार याच्या छातीत दुखत असल्याने त्याला रुग्णालयात नेण्यात आलं होतं. मात्र, काही वेळापूर्वीच त्याच्या निधनाचं वृत्त समोर आलं. त्यामुळे अकोल्यातील मनसे पदाधिकाऱ्यांसह सर्वच मनसैनिकांना मोठा धक्का बसला आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img