8 C
New York

Manasi Naik: “आयुष्य थांबवू नका”, मानसी नाईकची ‘ती’ पोस्ट चर्चेत

Published:

Manasi Naik: मराठी सिनेसृष्टीली अभिनेत्री मानसी नाईक (Mansi Naik) आपल्या सोशल मीडिया पोस्टमुळे नेहमीच खूप चर्चेत असते. मानसी नाईकने प्रदीप खरेरापासून (Pradip Kharera) घटस्फोट घेतल्यानंतर सकारात्मकता पसरवणाऱ्या पोस्ट खूपवेळा शेअर करत असते. मानसीचा पूर्वाश्रमीचा पती प्रदीप खरेराने दोन दिवसांपूर्वी साखरपुडा केला. मानसीने याचदरम्यान स्वतःचे मराठी लूकमधील काही सुंदर फोटो पोस्ट केले. या फोटोंच्या कॅप्शनने सर्वांचंच लक्ष वेधून घेतलं आहे. पिवळी काठापदराची साडी नेसून, हातात हिरवा चुडा घालून सुंदर असं फोटोशूट मानसीने केलं आहे. सिंगल असण्यासाठी खूप धाडस असावे लागतं, असं कॅप्शनमध्ये मानसीने तिने लिहिलं आहे.

मानसी नाईकने कॅप्शनमध्ये काय म्हटलं आहे?
Manasi Naik: कोणत्याही गोष्टीवर सेटल होणाऱ्या लोकांच्या या जगात “आपल्याला काहीतरी मिळत आहे असं म्हणून सिंगल राहण्यासाठी खूप धाडस असावे लागतं. आयुष्यात, प्रार्थना (Prayer), प्राधान्यक्रम (Priorities), शांतता (Peace), सकारात्मकता (Positivity), संयम (Patience) या ‘P’ वर ठाम राहा. जोपर्यंत तुम्हाला साजेसं आणि चांगलं कोणी भेटत नाही तोपर्यंत सिंगल राहा, सेटल होऊ नका.
प्रेमाची आशा ठेवा, प्रेमासाठी प्रार्थना करा, प्रेमाची स्वप्ने पाहा, मात्र प्रेमाची वाट पाहण्यात तुमचं आयुष्य थांबवू नका.
चुकीच्या व्यक्तीसोबत राहण्यापेक्षा सिंगल राहणं कधीही चांगलं आहे. या वर्षी मी हरले, जिंकले, अपयशी झाले, रडले, हसले, प्रेम केले, पण मी झुकले नाही. कणखर स्त्रिया असतात त्या कधीही हार मानत नाहीत. आपल्याला कदाचित कॉफी घ्यावी वाटेल, थोडं रडावं वाटेल किंवा एखादा दिवस काहीच काम न करता अंथरुणात घालवावा वाटेल. मात्र, यानंतर कणखर स्त्रिया आणखी सशक्त होऊन परततात.

मी माझ्या वेदना एखाद्या देवीप्रमाणे सहन केल्या आहेत. मी कधीही मागे वळून पाहत नाही, मी कधीही हार मानणार नाही… कधीही नाही. चीयर्स टू बीइंग मी,” असं कॅप्शन मानसीने या फोटोंना दिलं आहे. मानसीच्या या पोस्टवर कमेंट करून चाहत्यांनी तिचं भरभरून कौतुक केलं आहे. तर काहींनी यावर रेड हार्ट इमोजी कमेंट केले आहेत.

बिग बॉसच्या घरात वाहू लागले प्रेमाचे वारे!

मानसी नाईकचा घटस्फोट
जानेवारी २०२१ मध्ये मानसी नाईक व प्रदीप खरेरा यांनी लग्न केलं होतं. सुरुवातीच्या काळात दोघांमधलया वैवाहिक आयुष्यात सर्वकाही सुरळीत सुरू होतं, मात्र नंतर या दोघांमध्ये काही तरी बिनसलं व काही काळाने त्यांच्या घटस्फोटाची बातमी समोर आली. अवघ्या दीड वर्षात मानसी व प्रदीप विभक्त झाले.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img