निर्भयसिंह राणे
टीम इंडियाने (India) रविवारी, 28 जुलै रोजी पल्लेकेले येथे झाल्येल्या दुसऱ्या T20 सामन्यात सात गाडी राखून श्रीलंकेविरुद्धच्या तीन सामन्यांच्या मालिकेवर आपली पकड कायम ठेवून सिरीझ पटकावली. याआधी मेन इन ब्लुने पहिला सामना 43 धावांनी जिंकला होता. सूर्यकुमार यादवने (Suryakumar Yadav) नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतल्यानंतर, भारताच्या गोलंदाजांनी यजमानांना केवळ 161/9 पर्यंत रोखण्यासाठी चांगली कामगिरी केली. पावसाने हस्तक्षेप करून दुसरी इंनिंग फक्त आठ षटकांपर्यंत खेळवली गेली आणि 78 धावांचा असा सोपा लक्ष्य भारताने अगदी सहजपणे पूर्ण केला.
Women Asia Cup : श्रीलंकेने रचला इतिहास, भारताला हरवून पटकावलं आशिया कपचं विजेतेपद
यशस्वी जैस्वालने (Yashasvi Jaiswal) नेहमीप्रमाणेच धडाकेबाज फलंदाजीने 30 धाव केल्या. दुसऱ्या सामन्यात वनिंदूं हसरंगा त्याला बाद करूनही त्याने आपला परफॉर्मन्स कायम ठेवला. कर्णधार सूर्यकुमार यादवने 26 धावा करत त्याच्या रणनीतीमुळे आणि प्रभावी फलंदाजीमुळे ह्या मालिकेत सूर्यकुमार हा परफेक्ट ठरला. गोलंदाजीत उशिरा येऊन सुद्धा हादिक पंड्याने 2 विकेट्स घेतल्या आणि भारतीय संघाला श्रीलंकेला कमीत कमी धावांवर रोखण्यास मदत केली. रवी बिष्णोईच्या (Ravi Bishnoi) दमदार गुगलीमुळे तीन बळी मिळाले आणि त्यांनी ह्या सामन्यात सर्वोत्त इकॉनॉमिसुद्धा गाठली. पॉवरप्लेमध्ये मोहम्मद सिराज चमकला आणि त्यांनी श्रीलंकेचे 3 फलंदाजांचा बळी घेऊन 27 धाव दिल्या.
भारतीय संघ :
यशस्वी जैस्वाल, संजू सॅम्सन (WK), सूर्यकुमार यादव (C), हार्दिक पंड्या, ऋषभ पंत, रियान पराग, रिंकू सिंग, अक्षर पटेल, अर्शदीप सिंग, रवी बिष्णोई, मोहम्मद सिराज
श्रीलंका संघ :
कूसल मेंडिस (WK), पाथुम निसांका, कूसल परेरा, कामिन्दू मेंडिस, चारिथ असालंका (C), दसून शनाका, वनिंदूं हंसरंगा, रमेश मेंडिस, महेश तीक्ष्णा, माथीशा पाथीराना, बिनुरा फेर्नांडो