17.6 C
New York

NCP MLA Disqualification : अजितदादांसह 41 आमदारांना सर्वोच्च न्यायालयाची नोटीस

Published:

नवी दिल्ली

राष्ट्रवादी काँग्रेस आमदार अपात्र प्रकरणात (NCP MLA Disqualification) आज सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) सुनावणी झाली यावेळी सर्वोच्च न्यायालयाने उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्यासह 41 आमदारांना नोटीस पाठवली आहे. शिवसेना आमदार अपात्र (Shiv Sena MLA Disqualification) आणि राष्ट्रवादी काँग्रेस आमदार अपात्र प्रकरणात एकाच वेळी सुनावणी घेण्यात येत असे न्यायालयाने स्पष्ट केले आहे. आता या प्रकरणात 3 सप्टेंबर रोजी सुनावणी होणार आहे.

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिलेल्या आमदार अपात्रता प्रकरणाच्या निर्णयाविरोधात शरद पवार गटाने सुप्रीम कोर्टात धाव घेतली आहे. अजित पवार यांच्यासह त्यांच्यासोबत गेलेल्या आमदारांना अपात्र करा अशी मागणी जयंत पाटील यांनी केली आहे. या याचिकेविरोधात सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी पार पडली.

आजच्या सुनावणीदरम्यान सुप्रीम कोर्टाने शिवसेना आमदार अपात्र प्रकरण आणि राष्ट्रवादीचे आमदार अपात्रता प्रकरण एकाच दिवशी ऐकू असे मुख्य न्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी म्हटले आहे. पुढची सुनावणी एकापाठोपाठ ऐकू असे म्हणत कोर्टाकडून अजित पवार आणि त्यांच्यासह गेलेल्या आमदारांना नोटीसही पाठवली आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img