ठाण्यामधून मोठी बातमी समोर आली आहे. येथील ठाणे जिल्ह्याचे शिवसेना माजी जिल्हा प्रमुख रघुनाथ मोरे यांचा मुलगा मिलिंद मोरे यांची विरारच्या अर्नाळामध्ये (Crime News) हत्या करण्यात आली आहे. मोरे हे अचानक कोसळतानाचं दृश्य सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालं आहे. मोरे हे नवाबपूर येथील सेवन सी रिसॉर्टमध्ये कुटुंबीयासमवेत आले होते. काल सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास रिसॉर्टच्या बाहेर रिक्षाचे चाक पायावरून गेल्याने त्यांची याठिकाणी काही जणांसोबत बाचाबाची झाली. यावेळी काही लोकांनी मारहाण केल्यामुळे त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यात त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. या प्रकरणाची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गंभीर दखल घेऊन, तत्काळ पोलीस उपायुक्त जयंत बजबळे यांच्याशी फोनवरून चर्चा करून योग्य ती कारवाही करावी असे आदेश दिल्याची माहिती शिवसेना शिंदे गटाचे वसई तालुका प्रमुख सुदेश चौधरी यांनी सांगितलं. मृत मिलिंद मोरे वय वर्षे ४७ हे आपल्या कुटूंबासोबत ठाण्यात राहत होते.
वरळी सीफेस येथील एजी खान अब्दुल गफार खान रोडवर 20 जुलै रोजी बीएमडब्यल्यू गाडीने एका तरुणीला मागून धडक दिली होती. या अपघातानंतर दुचाकीस्वार विनोद लाड (28) याच्या डोक्याला मार लागल्याने तो गंभीर जखमी झाला होता. त्याच्यावर नायर रुग्णालयातील अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते. मात्र उपचारादरम्यान शनिवारी (27 जुलै) विनोदचा मृत्यू झाला. मिळालेल्या माहितीनुसार, विनोद लाड हा मूळचा मालवण येथील रहिवासी असून तो ठाण्यात ट्रान्सपोर्ट कंपनीत पर्यवेक्षक पदावर कामाला होता. 20 जुलै रोजी तो कौटुंबिक कार्यक्रमानिमित्त ठाण्याहून वरळी येथील फोर सीझन हॉटेलमध्ये जात होता. मात्र अपघातात त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी विनोदचा चुलत भाऊ किशोर लाड याच्या तक्रारीवरून वरळी पोलिसांनी गुन्हा दाखल केला. तसेच बीएमडब्ल्यू गाडी ठाण्यातील व्यवसायिकाची असल्याचे समोर आले आहे.
अजित पवारांची आणखी एक बडा नेता सोडणार साथ ?
Crime News अपघाताचे हायप्रोफाईल कनेशन
दरम्यान, काही दिवसांपूर्वी पुण्यातील पोर्शे अपघात प्रकरणाची चर्चा देशभर झाली होती. त्यानंतर वरळीतील हिट अँड रन प्रकरणही चर्चेत आले. कारण पुण्यातील अपघातात आरोपी अल्पवयीन होता, तर वरळी अपघातात आरोपीच्या वडीलांचे राजकारणाशी संबंध होते. या दोन्ही अपघातात प्रकरणाची चौकशी जसजशी पुढे जात गेली, तसतसे अनेक खळबळजनक खुलासे समोर आले होते. यानंतर आता पुन्हा एकदा ठाण्यातील व्यवसायिकाच्या बीएमडब्ल्यू गाडीमुळे अपघात झाला आहे. यात अपघात प्रकरणी चालकाविरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली आहे. मात्र आता या प्रकरणाची चौकशी जसजशी पुढे जाईल, तसतसे अनेक खुलासे समोर येणार का? हे पाहावे लागेल.