23.1 C
New York

 Anil Deshmukh : समित कदम फडणवीसांचा माणूस, देशमुखांनी फोटोच दाखवला

Published:

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्यावर आरोप करण्यासाठी माझ्याकडे पाठवण्यात आलेली समित कदम (Samit Kadam) नावाची व्यक्ती ही देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांच्या जवळची आहे. त्यामुळेच त्याला कोणतेही पद नसताना वाय प्लस दर्जाची सुरक्षा देखील देण्यात आलेली आहे. असं म्हणत अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांनी पत्रकार परिषदेमध्ये थेट समित कदम आणि देवेंद्र फडणवीस यांचे एकत्रित फोटो दाखवत आपल्या आरोपांवर आपण ठाम असल्याचं सांगितलं.

दरम्यान यावेळी बोलताना अनिल देशमुख म्हणाले की, समित कदम नावाच्या व्यक्तीला मी कधीही ओळखत नव्हतो. त्याला मी पाहिलेला देखील नव्हतं. तो पहिल्यांदा जेव्हा माझ्या घरी आला. तेव्हा त्याने एक इन्व्हलप आणलं होतं. त्यामध्ये माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे त्यांचे पुत्र आदित्य ठाकरे त्याचबरोबर त्यावेळी फडणवीसांच्या विरोधात असलेले अजित पवार आणि त्यांचे पुत्र पार्थ पवार यांच्यावर देखील आरोप लावण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी माझ्यावर खूप दबाव टाकला होता. तसेच देवेंद्र फडणवीस आणि सुमित कदम यांचे कनिष्ठ संबंध आहेत. त्याचे काही फोटो देखील माझ्याकडे आहेत. समितच्या पत्नीने फडणवीसांना राखी बांधत असल्याचाही फोटो आहे. यावरून लक्षात येते की, त्यांची संबंध किती जवळचे आहेत. त्याचबरोबर या व्यक्तीला कोणतेही पद नाही. तो कोणताही कार्यकर्ता नाही. तरी देखील त्याला वाय प्लस दर्जाची सुरक्षा देण्यात आली आहे. ती कशासाठी? असा सवाल देखील यावेळी अनिल देशमुख यांनी विचारला. त्यामुळे फडणवीस हे केवळ राजकीय नेत्यांवरच नाही. तर त्यांच्या मुलांना देखील विविध आरोपांमध्ये अडकवण्याचं गलिच्छ राजकारण करत आहेत. असं देशमुख म्हणाले.

राहुल गांधी आज लोकसभेत केंद्रीय अर्थसंकल्पावर बोलणार? 

Anil Deshmukh नेमकं प्रकरण काय आहे?

उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि अनिल परब यांना खोट्या आरोपांत अडकवण्यासाठीही माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दबाव टाकण्यात आला होता. असा खळबळजनक आरोप अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे अध्यक्ष श्याम मानव यांनी पत्रकार परिषद घेऊन केला होता. त्यांच्या या आरोपांनंतर राज्यातील राजकारण ढवळून निघालं आहे. श्याम मानव यांनी केलेल्या या दाव्यांना माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनीही दुजोरा दिला होता. त्यावर देशमुखांनी पत्रकार परिषदा घेत आपल्या आरोपांर ठाम असल्याचं दाखवून दिलं.

त्याचबरोबर देशमुख मानव यांच्या आरोपांनंतर फडणवीसांनी देखील देशमुखांना आव्हान दिलं आहे. फडणवीस म्हणाले की, अनिल देशमुख यांच्यावरती शंभर कोटींच्या वसुलींचे आरोप लागले. त्यावेळी महाविकास आघाडीचे सरकार होतं. आज पर्यंत मी बोललो नाही. कारण माझा एक सिद्धांत आहे. मी कुणाच्याही नादी लागत नाही आणि कोणी माझ्या नादी लागलं तर मी त्याला सोडत नाही. तर अनिल देशमुख यांच्या विरोधात काही ऑडिओ व्हिज्युअल्स हे त्यांच्याच पक्षातील लोकांनी मला आणून दिले होते. ज्यामध्ये ते उद्धव ठाकरे, शरद पवार, आज माझ्यावर जे आरोप केले त्याबाबत तसेच वाझेंवर यांच्याबाबत काय बोलत आहेत? हे सर्व रेकॉर्डिंग आहे. त्यामुळे जर कोणी रोज खोटं बोलून नॅरेटिव्ह सेट करत असतील. तर या सर्व गोष्टी मी पब्लिक करे कारण देवेंद्र फडणवीस कधीच पुरावे शिवाय बोलत नाही.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img