23.1 C
New York

Rinku Rajguru: आर्चीच्या घरी आली तिच्या हक्काची पाहुणी!

Published:

Rinku Rajguru: मराठी सिनेसृष्टीतला ‘सैराट’ हा चित्रपट तुफान गाजला होता. सैराट चित्रपटात मुख्य भूमिका साकारलेली अभिनेत्री रिंकू राजगुरु (Rinku Rajguru) आता महाराष्ट्रातील घराघरांत प्रसिद्ध झाली आहे. रिंकूला ‘सैराट’ चित्रपटातील ‘आर्ची’ या नावाने देखील ओळखलं जातं. प्रेक्षकांच्या व चाहत्यांची आवडती रिंकू राजगुरूच्या घरी एका हक्काच्या पाहुणीचं आगमन झालं आहे. याबद्दल रिंकूने सोशल मीडियावर फोटो शेअर करत माहिती दिली आहे.

Rinku Rajguru: नुकतीच रिंकू राजगुरुने तिच्या आयुष्यातील पहिली वहिली नवी गाडी खरेदी केली आहे. या आलिशान पाहुणीचे फोटो अभिनेत्रीने इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. गेल्या अनेक दिवसांत बऱ्याच मराठी कलाकारांनी नव्या गाड्या घेत आपली स्वप्नपूर्ती केल्याचं पाहायला मिळालं. यामध्ये आता रिंकू राजगुरूंच नाव देखील जोडलं गेलं आहे.

 मोहब्बतें लुटाऊँगा! सुरांच्या बादशाहची घरात होणार ग्रँड एन्ट्री

Rinku Rajguru: “पहिली गाडी ही कायम खास असते… असं कॅप्शन रिंकुने नव्या गाडीला दिल आहे आणि गाडीचे फोटो शेअर करत हक्काची पहिली गाडी खरेदी करण्याची भावना काहीतरी वेगळीच असते… जी तुम्ही शब्दांत व्यक्त करू शकत नाही. ही गाडी म्हणजे माझं नवीन प्रेम आहे. ”रिंकूने पांढऱ्या रंगाच्या आलिशान गाडीबरोबर ट्विनिंग करत फोटोशूट केलं आहे. चाहत्यांना रिंकूने नवीन गाडी खरेदी केल्याचं समजताच त्यांनी अभिनेत्रीवर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. ऋतुजा बागवे, सायली संजीव, स्वप्नील जोशी, छाया कदम, प्रार्थना बेहेरे, किशोर शहाणे, श्वेता रंजन यांनी कमेंट्स करत रिंकूवर कौतुकाचा वर्षाव केला आहे.

दरम्यान, रिंकू राजगुरु ( Rinku Rajguru ) ‘झिम्मा २’ या शेवटच्या चित्रपटात झळकली होती. यामध्ये तिने तानिया म्हणून साकारलेल्या या भूमिकेचं प्रेक्षकांनी भरभरून कौतुक केलं. तिच्यासोबत या चित्रपटात सुचित्रा बांदेकर, सुहास जोशी, शिवानी सुर्वे, क्षिती जोग, निर्मिती सावंत, सायली संजीव व सिद्धार्थ चांदेकर यांनी मुख्य भूमिका साकारल्या होत्या. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर सुद्धा चांगली बक्कळ कमाई केली होती.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img