जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पावसाने (Pune Rain) थैमान घातले आहे. यामुळे जिल्ह्यातील धरणसाठ्यात कमालीची वाढ झाली आहे. 85.59 टक्के पाणीसाठा टेमघर, वरसगाव, पानशेत, खडकवासला या धरण साखळीत उपलब्ध झाला आहे. त्यामुळे खडकवासला धरणातून तब्बल 22 हजार ८८० क्युसेकने पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. पाण्याचा विसर्ग आणखी वाढल्यास पुन्हा घरात पाणी शिरेल, या भीतीने नदीकाठी राहणाऱ्या पुणेकरांची धडधड वाढली आहे.
जुलैअखेर दमदार पाऊस चारही धरणांच्या पाणलोट क्षेत्रात होत असल्याने पिण्याच्या पाण्याची शहराला सोय झाली आहे. मात्र दमदार पावसामुळे पुण्यातील जनजीवन विस्कळीत झाल्याचे चित्र आहे. पाण्याचा विसर्ग खडकवासला धरणातून (Khadakwasla Dam) मोठ्या प्रमाणावर सुरु असल्याने बाबा भिडे पूल पुन्हा एकदा पाण्याखाली गेला आहे. त्यामुळे रस्ता वाहतुकीसाठी हा परिसरातील पूर्णपणे बंद करण्यात आला आहे.
Pune Rain खडकवासला धरण साखळीत पावसाचे थैमान
जून महिन्यात पावसाने ओढ दिली होती. दमदार पाऊस जुलैच्या मध्यानंतर बरसला आणि पाणीसाठ्यात धरणांच्या पाणलोट क्षेत्रात कमालीची वाढ झाली. खडकवासला धरण साखळीतही पावसाने थैमान घातले आहे. रविवारी पानशेत धरणातून पहिल्यांदाच 4,712 क्युसेकने विसर्ग सोडण्यात आला. तर, धरणांच्या परिसरात संततधार कायम असल्याने रविवारी खडकवासलामधून पुन्हा विसर्ग सोडण्यात आला.
समित कदम फडणवीसांचा माणूस, देशमुखांनी फोटोच दाखवला
Pune Rain खडकवासलातून 22 हजार ८८० क्युसेकने पाण्याचा विसर्ग
खडकवासला धरणाच्या सांडव्यावरून मुठा नदीपात्रात सोमवारी सकाळी 9 वाजता 22 हजार 880 क्यूसेकने पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. पावसाच्या प्रमाणानुसार विसर्ग कमी-अधिक करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. नागरिकांनी नदीपात्रात उतरू नये. प्रशासनाने नदीपात्रात काही तत्सम साहित्य अथवा जनावरे असल्यास तात्काळ हलविण्यात यावीत, असा सूचना दिल्या आहेत.
Pune Rain पानशेत धरणातून 15 हजार 136 क्यूसेकने पाण्याचा विसर्ग
पानशेत धरणाच्या पाणी पातळीत मुसळधार पावसामुळे मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. पहिल्यांदाच 4,712 क्युसेकने रविवारी पानशेत धरणातून विसर्ग सोडण्यात आला. तर हा विसर्ग 15 हजार 136 क्यूसेकने आज पहाटे चार वाजता वाढवण्यात आला आहे. नागरिकांनी नदीपात्रात उतरू नये, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. तसेच सतर्कतेचा इशारा नदीकाठच्या गावांना देण्यात आला आहे.