23.1 C
New York

Raha Kapoor: हुबेहूब आलिया! रणबीर- आलियाच्या लेकीचा कॅमेरात पाहून गोड अंदाज

Published:

Raha Kapoor: बॉलीवूडचा ऍनिमल रणबीर कपूर (Ranbir Kapoor) आणि बॉलीवूडची गंगुबाई आलिया भट्ट (Alia Bhatt) या दोघांपेक्षा सध्या त्यांची गोंडस लेक राहाची सोशल मीडियावर सर्वत्र चर्चा रंगलेली असते. अवघ्या दीड वर्षांच्या राहाचे गोंडस हावभाव, तिचं निर्मळ हास्य पाहून सर्वांनाच तिची भुरळ पडली आहे. राहा कपूर (Raha Kapoor) नेटकऱ्यांसह बॉलीवूडमधल्या इतर स्टार्सची सुद्धा खूपच लाडकी आहे. अंबानींच्या प्री-वेडिंग सोहळ्यात राहा तिचे आई-बाबा आलिया व रणबीरसह सहभागी झाली होती. यावेळी जवळपास प्रत्येक सेलिब्रिटीने राहाची विचारपूस केल्याचं व्हायरल व्हिडीओंमध्ये पाहायला मिळालं होतं.

Raha Kapoor: ६ नोव्हेंबर २०२२ रोजी राहा कपूरचा (Raha Kapoor) जन्म झाला. राहाच्या जन्मानंतर आलियाने जवळपास ४-५ महिने इंडस्ट्रीमधून ब्रेक घेतला होता. राहा थोडी मोठी झाल्यावर अभिनेत्रीने पुन्हा एकदा नव्याने कामाला सुरुवात केली. रणबीर–आलियाने राहाचा जन्म झाल्यावर जवळपास वर्षभर लेकीचा चेहरा कोणत्याही फोटोमध्ये रिव्हिल केला नव्हता. गेल्यावर्षी डिसेंबर महिन्यात ख्रिसमसच्या दिवशी आलिया, रणबीर व राहा या कपूर कुटुंबीयांनी पापाराझींसमोर एकत्र येऊन पोज दिल्या… याचवेळी राहा पहिल्यांदा माध्यमांसमोर आली होती.

रणबीर-आलियाने राहाचा चेहरा रिव्हिल करताच इंटरनेटवर सर्वत्र तिचे फोटो–व्हिडीओ व्हायरल झाले होते. तिच्यावर सर्व स्तरांतून शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला होता. रणबीर-आलियाची आता ही गोंडस लेक हळुहळू मोठी होत आहे. काही दिवसांपूर्वीच आलिया लेकीला कडेवर घेऊन नव्या घराची पाहणी करण्यासाठी गेली होती. मात्र, आता राहा अगदी व्यवस्थित चालू लागली आहे. वांद्रे येथील कपूर कुटुंबीयांच्या निवासस्थाना बाहेरचा राहाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. इंस्टाग्रामवर ‘विरल भय्यानी’ या पापाराझी पेजवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे.

मोहब्बतें लुटाऊँगा! सुरांच्या बादशाहची घरात होणार ग्रँड एन्ट्री

Raha Kapoor: या व्हिडीओमध्ये राहा कपूर (Raha Kapoor) कॅमेऱ्यांकडे व पापाराझींना पाहून खुदकन हसत असल्याचं पाहायला मिळत आहे. यानंतर रणबीर येताच डॅडीचा हात पकडून राहाने पहिल्यांदाच पापाराझींसमोर गोंडस हावभाव देऊन पोज दिल्या. रणबीर थोडं पुढे चालत जाताच पुन्हा एकदा लेकीला कडेवर उचलून घेतल्याचं पाहायला मिळालं. राहा यामध्ये अगदी गोंडस दिसत असून नेटकऱ्यांनी या व्हिडीओवर लाइक्स व कमेंट्सचा वर्षाव केला आहे.

“आता राहा एकदम आलियासारखी दिसतेय”,“राहा किती लवकर मोठी झाली”, “किती गोड हसतेय”,“खरंच राहा खूपच गोड आहे”, “सेम टू सेम आलिया”,अशा कमेंट्सचा वर्षाव नेटकऱ्यांनी या व्हिडिओवर केला आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img