23.1 C
New York

Pune : पिंपरी चिंचवडमध्ये कारने स्कूल बसला उडवलं, दोन विद्यार्थी जखमी

Published:

पुणे

सुसाट वेगात असलेल्या आलिशान कारने विद्यार्थ्यांनी खचाखच भरलेल्या स्कूल बसला (School Bus Accident) जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती, की यामध्ये बसचा समोरील भागाचा चक्काचूर झाला. अंगाचा थरकाप (Pune) उडवणारी ही घटना पिंपरी चिंचवड (Pimpari Chinchwad) शहरात आज सोमवारी दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास घडली. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही.

मिळालेल्या माहितीनुसार, पिंपरी चिंचवड शहरातील सायन्स पार्क परिसरात ही घटना घडली आहे. अपघातग्रस्त बस शाळेतील विद्यार्थ्यांना घेऊन निघाली होती. या बसमधून 15 विद्यार्थी प्रवास करीत होते. त्याचवेळी समोरून भरधाव वेगात आलिशान कार आली. कार येत असल्याचं बघताच बसचालकाने ब्रेक मारला. बसमधील 2 विद्यार्थी जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. या घटनेनं परिसरातून संताप व्यक्त केला जातोय.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img