23.1 C
New York

Pune Flood : पुण्यातील पुराचा पहिला दणका वरिष्ठ अधिकाऱ्यांना; थेट निलंबनाची कारवाई

Published:

पुणे

खडकवासला (Sinhagad) धरणातून मुठा नदीपात्रात सोडलेल्या पाण्यामुळे (Pune) सिंहगड रस्ता परिसरातील अनेक घरांमध्ये पाणी (Pune Flood) घुसले. त्यामुळे हाहाकार उडाला. केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ (Murlidhar Mohol), पालकमंत्री अजित पवारांनी (Ajit Pawar) तिथे जाऊन पाहणी केली. काही ठिकाणी त्यांना नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागले. त्यानंतर या स्थितीचे खापर वरिष्ठ अधिकाऱ्यांवर फोडण्यात आले आहे.

पुण्यात नदीचे पाणी शिरल्याने चिखल गाळ व इतर प्रकारची स्वच्छता करताना हलगर्जीपणा केल्याचा ठपका ठेवून पुणे महापालिकेच्या सिंहगड रोड क्षेत्रीय कार्यालयातील सहाय्यक आयुक्त संदीप खलाटे यांचं निलंबन करण्यात आले आहे. पुणे पालिका आयुक्त राजेंद्र भोसले यांनी याबाबतचे आदेश जारी केले आहेत. मात्र ज्या पाटबंधारे विभागाने पाणी सोडण्याचे आदेश दिले त्या अधिकाऱ्यांवर कोणतेही कारवाई करण्यात आली नाही.

दरम्यान दुसऱ्याने केलेल्या चुकीचे खापर सहाय्यक आयुक्तांच्या डोक्यावर फुटल्याचे आणि सहाय्यक आयुक्त संदीप खलाटे यांचा राजकीय बळी गेल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे पुणे महानगरपालिकेच्या घनकचरा विभागाकडून काळी फीत लावून निषेध व्यक्त करण्यात आला आहे

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img