निर्भयसिंह राणे
Nothing Phone 2a Plus 31 जुलै रोजी भारतात लाँच होणार आहे आणि कंपनीने आगामी Nothing फोनचे काही स्पेक्स इव्हेंटच्या काही दिवस आधी उघड केले आहेत. प्लस मॉडेल विद्यमान फोन 2a मॉडेलची अधिक शक्तिशाली आवृत्ती आहे आणि या मॉडेलपेक्षा किंचित महाग असेल.नथिंग फोन 2a प्लसची किंमत 30,000 रुपयांपेक्षा कमी असण्याची अपेक्षा आहे. त्याच्या सोबतीचा फोन, नथिंग फोन 2a, भारतात मार्चमध्ये 23,999 रुपयांमध्ये घोषित करण्यात आला. अधिक प्रीमियम कस्टमरांसाठी, नथिंग फोन 2 मॉडेलची 44,999 रुपयांमध्ये घोषित केला होता. प्लस आवृत्ती ही फोन 2a ची एक चांगली आवृत्ती असल्याने आणि ती मूळ नथिंग फोन सिरीझइतकी प्रीमियम नसल्यामुळे, नवीन मॉडेलची भारतातील किंमत 30,000 रुपयांच्या श्रेणीत येण्याची शक्यता आहे.
आगामी फोन 2a Plus मध्ये MediaTek Dimensity 7350 Pro 5G प्रोसेसर असेल, या चिपसेटसह लाँच होणारा हा पहिला स्मार्टफोन असणार आहे आणि याची पृष्टि स्वतः कंपनीने दिली आहे. कंपनीचा दावा आहे की हा नवीन डिव्हाइस फोन 2a पेक्षा जवळपास 10 टक्के वेगवान CPU असेल. “फोन 2a प्लससह, आम्हाला एक वेगवान आणि जाणकार वापरकर्त्यांसाठी अधिक प्रोसेसिंग पॉवर असलेल्या फोनची मागणी होती आणि आम्ही ती पूर्ण केली. आम्ही आधीच्या फोनच्या काही सुधारणा ह्या फोनमध्ये पूर्ण केल्या आहेत ज्यांनी युझर्सना एक नवीन अनुभव मिळेल.
MediaTek Dimensity 7350 Pro 5G प्रोसेसरला 12GB पर्यंत RAM असणार आहे, जे RAM बुस्टर तंत्रज्ञानाद्वारे 8GB ने वाढवता येते. कॅमेरा क्षमतेच्या बाबतीत, नथिंग फोन 2a Plus HDR आणि HDR 10+ प्लेबॅकसह समोर आणि मागील दोन्ही कॅमेऱ्यांमध्ये 4K व्हिडिओ रेकॉर्डिंगसाठी सपोर्ट करेल.
Apple iPhone: चीनमधील मंदीच्या पार्श्वभूमीवर भारतात ॲपलने ने आयफोनच्या किमतीत केली कपात
लिक्सवर विश्वास ठेवला तर, नथिंग फोन 2a प्लस 120HZ रिफ्रेश रेटसह 6.7-इंच AMOLED स्क्रीनसह येईल. यात 5000mAh ची बॅटरी आणि 50W फास्ट चार्जिंग असू शकते. फोन 2a वर असणाऱ्या 32 मेगापिक्सल कॅमेराऐवजी 50 मेगापिक्सलच्या सेल्फी कॅमेरासह फोन येईल अशी शक्यता आहे.