23.1 C
New York

Sion Bridge : 112 वर्ष जुना शीव उड्डाणपूल ‘या’ तारखेपासून वाहतूकीसाठी बंद

Published:

मुंबई

मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी समोर येत आहे. 1 ऑगस्टपासून शीव उड्डाणपूल (Sion Bridge) वाहतुकीसाठी बंद करण्यात येणार आहे. वांद्रे-कुर्ला संकुल, कुर्ला एलबीएस मार्ग, धारावी आणि शीव यांना जोडणारा हा पूर पाडण्यात येणार असून हा उड्डाणपूल बंद झाल्याने मुंबईतील वाहतूक कोंडीची समस्या वाढण्याची शक्यता आहे. शीव उड्डाणपूल हा 112 वर्षे जुना असून हा पूल जीर्ण झाल्याने पाडण्यात येणार आहे. गेल्या महिन्यातच या पुलावरुन अवजड वाहतूक बंद करण्यात आली होती. पण आता पुलावरील वाहतूक पूर्णतः बंद करण्यात आली आहे. जुलै 2026 दोन वर्षांच्या कालावधी पर्यंत नवीन पूल बांधण्याचं लक्ष ठेवण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. त्यानुसार, नवीन पुलाची बांधणी केली जाणार असून त्या करता हा पूल पाडण्यात येणार आहे. म्हणून 31 जुलैच्या मध्यरात्रीपासूनच हा पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात येणार आहे.

आयआयटी, मुंबईने त्यांच्या स्ट्रक्चरल ऑडिट रिपोर्टमध्ये स्टील गर्डर्स आणि आरसीसी स्लॅबसह नवीन आरओबी पुन्हा बांधण्याची शिफारस केली होती. तसेच, मध्य रेल्वेवरील सीएसएमटी ते कुर्ला दरम्यानच्या प्रस्तावित पाचव्या आणि सहाव्या मार्गाच्या कामात अडथळा ठरत असल्याने तो पाडून त्याची पुनर्बांधणी केली जाणार आहे. सध्या पुलाच्या दोन्ही बाजूला साधारण 10 ते 15 फूट उंच पत्रे लावण्यात आले आहेत.

पुनर्बांधणीच्या कामादरम्यान नागरिकांना सायन रोड ओव्हर ब्रिजच्या दोन्ही बाजूला असलेले पर्यायी सार्वजनिक पादचारी पूलाचा वापर करता येणार आहे. रस्त्याच्या वापर करणाऱ्या वाहन चालकांनी वाहतूक विभागाने जारी केलेल्या वाहतूक नियमन मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करावे, असे आवाहन केले आहे. तसेच महत्त्वाचे काम पार पाडण्यासाठी प्रवाशांनी सहकार्य करावे आणि होणाऱ्या गैरसोयीबद्दल मध्य रेल्वेने दिलगीरीदेखील व्यक्त केली आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img