26.6 C
New York

Jewellery Market: मुंबईमध्ये ‘या’ ठिकाणी मिळतील सर्वात स्वस्त आणि मस्त ज्वेलरी!

Published:

Jewellery Market: आपण कोणतेही कपडे घातले तर त्यावर दागिने कोणते घालायचे हा प्रश्न महिलांना कायम पडलेला असतो. अशात प्रत्येक ड्रेसवर, साडीवर, किंवा वेस्टर्न ड्रेसवर एकच ज्वेलरी कशी घालणार? असे प्रश्न देखील महिलांना किंवा मुलींना पडलेले असतात. एवढंच नव्हे, तर दागिने एकदाच घालायचे नंतर तसेच पडून राहतील… असा विचार देखील बऱ्याच महिला करतात. मात्र काही महिलांना फार आवड देखील असते जसं कोणताही दागिना घेतला की अगदी व्यवस्थितपणे ठेऊन द्यायचा. पण तुम्हाला हे माहितेय का? मुंबईत असे काही मार्केट आहेत, जिथे तुम्हाला कमी किंमतीत पण चांगले दागिने सहजचं मिळू शकतील. ज्यामुळे प्रत्येक ड्रेसवर तुम्ही वेगळे दागिने परिधान करू शकता.

Jewellery Market: इतकंच नाही तर, सध्याच्या दिवसांमध्ये सोन्याचे दागिने परिधान करणं देखील धोक्याचं आहे. त्यामुळेचं महिला जास्तीत-जास्त आर्टिफिशियल दागिन्यांना अधिक महत्त्व देतात. आर्टिफिशियल दागिने भले सोने-चांदीचे नसले तरी दिसायला प्रचंड आकर्षक दिसतात. आता तर नवंनवीन आर्टिफिशियल दागिने त्यातसुद्धा वेगवेगळ्या डिझाइन्स मार्केटमध्ये पाहायला मिळतात. तर मुंबईत असे काही मार्केट आहेत, जिथे तुम्हाला स्वस्त आणि आकर्षक दागिने मिळतीत.

श्रावणात तुमचा आहार कसा हवा? जाणून घ्या हेल्दी टिप्स…

कुलाबा कॉजवे – या मार्केटमध्ये तुम्हाला वेस्टर्न, मोठंमोठे ट्रेडिशनल दागिने, ऑक्सिडाइज्ड कानातले, गळ्यातील ज्वेलरी, नोज पिन, अंगठ्या, ब्रेसलेट आणि इतर दागिने पाहायला मिळतील. जर तुम्हाला आकर्षक आणि पॉकेटफ्रेंडली दागिने खरेदी करायचे असतील तर तुम्ही एकदा तरी कुलाबा कॉजवे मार्केटमध्ये भेट द्या. अनेक प्रकारचे दागिने तुम्हाला पाहायला मिळतील. तुम्हाला तुमच्या मैत्रिणीसाठी गिफ्ट घ्यायचं असेल तर हे मार्केट तुमच्यासाठी उत्तम ठरू शकत. चर्चगेट स्टेशनपासून फक्त 10 मिनिटांच्या अंतरावर कोलाबा मार्केट आहे.

हिल रोड – तुमच्यासाठी हिल रोड देखील शॉपिंगसाठी उत्तम ठिकाण आहे. हिल रोड कपड्यांसाठी प्रसिद्ध आहे. मात्र या मार्केटमध्ये दागिने देखील मिळतात. तुम्ही येथे ऑक्सिडाइज्डचे दागिने अगदी स्वस्तात खरेदी करून बार्गेनिंग सुद्धा करू शकता. रस्त्यावरील स्टॉल्सपासून ते दुकानांपर्यंत विविध प्रकारचे दागिने मिळतील. वांद्रे स्टेशनपासून सुमारे 20 मिनिटांच्या अंतरावर हिल रोड आहे.

लिंकिंग रोड – वांद्रे येथे लिंकिंग रोड देखील शॉपिंगसाठी बेस्ट ठिकाण आहे. येथे वेस्टर्न कपडे जास्तीत जास्त मिळतात. शिवाय ज्वेलरीसाठी देखील हे मार्केट प्रसिद्ध आहे. मार्केटमध्ये तुम्ही इयररिंग्स, नेकपीसपासून, ब्रेसलेट, अंगठी असे बरेच दागिने मिळतात. वांद्रे स्टेशन बाहेरून लिंकिंग रोडला जाण्यासाठी रिक्षा मिळतात.

भुलेश्वर – भुलेश्वर हे मार्केट अतिशय मोठं आहे. इथे तुम्हाला फक्त दागिने नाही तर बाकीच्या इतर गोष्टीसुद्धा मिळतील. सणावाराच्या दिवशी भुलेश्वर मार्केटमध्ये जास्त प्रमाणात गर्दी असते. लग्नासाठी दागिने खरेदी करण्यास देखील अनेक जण भूलेश्वर मार्केटमध्ये येतात. भुलेश्वर मार्केट हे मुंबईतील फार जुनं मार्केट आहे. पारंपरिक दागिन्यांसाठी अतिशय लोकप्रिय मार्केट म्हणून ओळखलं जातं. तुम्हाला जी गोष्ट पाहिजे ती बाकी कुठे मिळत नाही तर तुम्हाला इथे ती गोष्ट हमखास मिळून जाते. येथे तुम्हाला सर्व प्रकारचे दागिने सहज मिळतील, त्यामुळे तुम्ही येथे एकदा अवश्य भेट द्या.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img