17.4 C
New York

Haribhau Bagade : हरिभाऊ बागडे यांनी दिला आमदारकीचा राजीनामा

Published:

मुंबई

भाजपचे ज्येष्ठ नेते, माजी विधानसभा अध्यक्ष, फुलंब्री विधानसभा मतदारसंघाचे आमदार हरिभाऊ बागडे (Haribhau Bagade) यांची राजस्थानच्या राज्यपाल पदी नियुक्ती झाली. राजस्थानच्या राज्यपाल पदाचा पदभार स्वीकारण्यासाठी हरिभाऊ बागडे यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा (Resignation) विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या सुपूर्द केला आहे. राजस्थानचे राज्यपाल म्हणून पदभार स्वीकारणार आहेत.

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी 27 जुलै रोजी देशात अनेक राज्यपालांची नियुक्ती केली. त्यातील काही नेते महाराष्ट्रातील आहेत. त्यापैकी एक म्हणजे हरिभाऊ किसनराव बागडे. हरिभाऊ यांची राजस्थानच्या राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे, भाजपने हरिभाऊ बागडेंना मोठी संधी दिली असून थेट राज्यपालपदाची जबाबदारी आता त्यांच्यावर देण्यात आली आहे. हरिभाऊ बागडे यांच्या राजीनामामुळे आता, फुलंब्री मतदारसंघातून भाजपच्या इच्छुक उमेदवारांची जागा आपल्या पदरात पाडून घेण्यासाठी गर्दी पाहायला मिळत आहेत. दरम्यान, फुलंब्री मतदारसंघातून भाजपकडून अनुराध चव्हण, राधाकिसन पठाडे, सुहास सिरसाट, विजय औताडे, रामभाऊ शेळके, राजेंद्र साबळे, प्रदीप पाटील आणि दामुअण्णा नवपुते ही नावे इच्छुक आहेत.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img